Ladki bahin yojana Bank Seeding Status यामुळे हफ्ते जमा होण्यास होतोय उशीर

 

Ladki bahin yojana next installment : मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील महिलांना हफ्ते  वितरण करणे सध्या सुरू आहे. मात्र बहुतांशी महिलांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक केलेले नाही या कारणामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यामध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे महिलांना आधार लिंक करण्याची काम लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत तरच या योजनेअंतर्गत येणारे  हप्ते मिळणार आहेत.

 आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे गरजेचे का आहे. (Ladki bahin yojana Bank Seeding Status)

या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणारे हप्ते हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या महिलांच्या आधार खात्याशी संलग्नित असलेल्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत नेमक्या याच कारणासाठी महिलांची बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी सूचना देऊन देखील महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड ला लिंक केलेली नाही त्याच कारणामुळे दुसऱ्या टप्प्यातील महिलांना फॉर्म मंजूर झालेला असून देखील अद्याप पर्यंत दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही. महिलांनी फॉर्म भरण्यासाठी जेवढी तत्परता दाखवली तेवढी तत्परता मात्र आधार कार्ड ला लिंक करण्यामध्ये महिला दाखवत नाहीत त्यामुळे महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यामध्ये विलंब होत आहे.

 

आधार कार्ड बँक खात्याला लिंक कसे करावे Check Aadhaar linking status with bank

आपल्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहेत त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचा फॉर्म भरून द्यावा किंवा जर नवीन अकाउंट ओपन केलेली नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन नवीन बँक खाते करून घ्यावी त्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 24 तासांमध्ये आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले जाते.
 वरील प्रकारे महिला आपल्या सोयीनुसार बँक खात्याला आधार नंबर  लिंक करू शकतात.

अशा प्रकारे ज्या महिलांचे खाते आधार लिंक आहे अशा महिलांना हफ्ते जमा होण्य्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येत नसून. ज्या महिलांचे आधार लिंक नसेल ते त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे तरच या योजनेचा लाभ महिलांना लवकर मिळेल.

Check Aadhaar linking status with bank

 


Leave a Comment