monsoon in maharashtra : राज्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागामधे जोरदार सुरुवात झाली होती मात्र तरी देखील काही भागांमधे पेरणी योग्य असा समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी पिकांच्या पेरण्या वेळेवर करता आल्या मात्र पाऊस अभावी काही ठिकाणी पेरणीसाठी उशीर झाला. आता मात्र मान्सून परतीच्या प्रवासाला उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मान्सून किती कालावधीसाठी असतो सक्रिय monsoon in maharashtra
भारतामध्ये जून महिन्यामध्ये मान्सून चा पाऊस सक्रिय होऊन या मान्सूनच्या पावसावर देशातील संपूर्ण शेतीच या पावसावरच अवलंबून आहे . या मान्सूनच्या पावसा मुळे सुमारे 70 टक्के जलसाठे या पावसावर भरली जातात. आणि सर्वांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच सर्व प्रकारच्या वापरासाठीचे पाणी या मान्सूनच्या पावसामुळेच उपलब्ध होते. जून मध्ये सुरू झालेल्या या मान्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवासा सप्टेंबर महिन्याच्या मध्यामध्ये सुरू होऊन ऑक्टोंबर महिन्याच्या मध्यापर्यंत त्याचा परतीचा प्रवास सुरू राहत असतो. सुरुवातीच्या काळात पेरणी झालेल्या सोयाबीन नंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काढ णीला सुरुवात होईल अशातच सतत मान्सून पावसाच्या प्रतीचा प्रवास हा उशिराने सुरू होणाऱ्या असल्याची बातमी समोर येत आहे असे जर झाली तर सोयाबीन या पिकांची काढणी करणारे शेतकऱ्यांना अडचणी येऊ शकतात.
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार monsoon in maharashtra
खरीप हंगामामध्ये पेरणी केलेल्या पिकांची काढणी सर्व साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. मात्र परतीचा प्रवास लांबल्यास खरीप हंगामामध्ये पेरणी केलेलं भात, मक्का, सोयाबीन या पिकांच्या काढणी च्या हंगामामध्ये पाऊस आल्यास पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
सप्टेंबर च्या तिसरा आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार.
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कमी दाब निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्ती केली आहे. काढणीच्या हंगामामध्ये पाऊस आणि पाऊस राहिला तर शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाव लागून आर्थिक फटका बसू शकतो. मात्र अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये फटका बसनार असला तरी त्यांना रब्बी हंगामामध्ये पेरणी करान्यासाठी मात्र फायदा होणार आहे.
अशाप्रकारे शेतकऱ्यांनी नेहमीच अवकाळी संकटांना सामोरे जावे लागते. आता मात्र काढणीच्या हंगामामध्ये पाऊस पडल्यास हातात येणारे पिक घरामधे येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागणार.monsoon in maharashtra