Weather Update महाराष्ट्रामध्ये पावसांना चांगल्या प्रकारे सुरूवात झाली असून राज्याच्या विविध भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. मात्र तरी काही भागांमध्ये पावसाने आणखी हजेरी लावली नसल्याने शेतकरी पेरणीच्या आशेने आभाळाकडे डोळे लावून आहेत.आणखी काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
हवामान विभागाने राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा पडेल असा इशारा दिला आहे त्यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे येलो अलर्ट च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आले आहे.
Weather Update मराठवाडा कोकण विभागासाठी येलो अलर्ट
रविवारी दिवसभरामध्ये मान्सूनच्या वाटचालीमधील काहीच वाटचाल झाली नाही. मराठवाड्यातील काही भागांमध्ये पेरणीसाठी योग्य असा समाधानकारक पाऊस झालेला आहे. तर काही भागांमधे ढग फुटी सदृश पाऊस झाला असल्यामुळे माराठड्यातील पेरणीला सुरवात झाली असून काही भागांमधे पेरण्या चालू आहेत.
मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून, खानदेश आणि विदर्भामध्ये आणखी देखील मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण सध्यातरी तयार नसल्यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागात तसेच मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Weather Update
मुंबईमध्ये हलका ते मध्यम पाऊस
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Weather Updateपुणे शहरात ढगाळ वातावरण हलका पाऊस
पुणे शहरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Weather Update नागपूर शहर
हवामान खात्याचा अंदाजानुसार नागपूर शहरांमध्ये 16 तारखेला मान्सूनचा आगमन होईल असा अंदाज वर्तविण्यात आलेला होता मात्र तरीही १६ तारखेला मान्सूनचे आगमन झालेली नाही. रविवारी दिवसभर आकाशामध्ये ढगांची दाटी दिसून आली दिसून आली मात्र मात्र मान्सूनचा अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे तसेच ढगा मध्ये ओलावा कमी असल्यामुळे माध्यमातून पाऊस पडला नाही. रविवारी सायंकाळी कुठं कोणाच्या नंतर सायंकाळी ढग दाटून येऊन हलक्या सरींचा मारा झाला मात्र मानसून साठी आणखी वाटच पाहवी लागणार असे चित्र नागपूर मध्ये दिसत आहे. रविवारी झालेल्या हलक्या सरीमुळे नागपूर शहराचे तापमान एक दिवसानंतर 40° च्या खाली घसरले त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रता पासून काही अंशी दिलासा मिळाला आहे.
अशा प्रकारे, राज्यभर पाऊस हजेरी लावत असून शेतकरी आपल्या मशागतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत . तरी शेतकरी यांनी हवामान विभागाच्या सूचना कडे लक्ष ठेऊन आपले व जनावरे यांच्या सुरक्षित कडे लक्ष पुरवावे.weather Update