TIRTH DARSHAN YOJNA राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु

TIRTH DARSHAN YOJNA भारतामध्ये विविध धर्म पंथाची लोक वास्तव्यास आहेत महाराष्ट्र संताची भूमी म्हणून  ओळखली जाते आणि महाराष्ट्र विविध संत होऊन गेले आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताबाहेर झाला असून भारतात भक्ती मार्गाची  मोठ्या परंपरा अस्तित्व आहे. आयुष्यात एकदा तरी तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची आणि त्यांची इच्छा असते मात्र गोरगरीब सर्वसामान्य घरात ती परिस्थिती सोबत कोणी नसल्यामुळे त्यांची इच्छा अ पूर्ण राहते ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी याकरिता साठ वर्षे व त्यावर अधिक वयाची नागरिकांना तीर्थ क्षेत्रांना भेट  देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांना मधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

TIRTH DARSHAN YOJNA योजनेची व्याप्ती 

सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशामधील प्रमुख तीर्थस्थळांछा समावेश राहील. या  यादीमध्ये ठिकाने कमी किंवा जास्त होऊ शकतात. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती या योजनेचा एका वेळेस लाभ घेऊ शकतो आणि या अंतर्गत प्रति व्यक्तीला तीस हजार इतका खर्च दिला जाईल.

TIRTH DARSHAN YOJNA योजनेचे लाभार्थी 

राज्यातील साठ वर्ष त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजने करिता पात्र राहतील.

TIRTH DARSHAN YOJNA योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता

1.लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा.

2.वय साठ वर्ष किंवा त्यावर असावे.

3.वार्षिक उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

TIRTH DARSHAN YOJNA खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत

1.योजनेच्या लाभार्थीच्या ऑनलाईन अर्ज.

2. आधार कार्ड ,रेशन कार्ड.

3.महाराष्ट्र राज्याचे आधीवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र.

4.आधीवासी प्रमाणपत्र  उपलब्ध नसेल त्याऐवजी रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह धरण्यात येतील.

5.उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड.

6.वैद्यकीय प्रमाणपत्र.

7.पासपोर्ट फोटो.

8जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक.

9.योजनेच्या अटी शर्ती चे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

TIRTH DARSHAN YOJNAखालील नागरिक या योजनेसाठी अपात्र असतील
आयकर भरणाऱ्या कुटुंबातील सदस्य.
सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेणारे कर्मचारी.
विद्यमान किंवा माजी खासदार आमदार यांच्या कुटुंबातील सदस्य.
ज्या कुटुंबातील सदस्य यांचे नावावर चार चाकी वाहन नावावर असणारे व्यक्ती .
प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसणारे नागरिक कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असणारे  नागरिक.अशा प्रकारे जेष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत दर्शनाचा लाभं घेऊ शकणार आहेत .TIRTH DARSHAN YOJNA

Leave a Comment