soyabeen cotton anudan कापूस सोयाबीन अनुदान कोणाला मिळणार या पद्धतीने करा चेक

soyabeen cotton anudan : राज्य सरकारने भावांतर योजने अंतर्गत कापूस सोयाबीन या पीक करीता हेक्टरी मदत जाहीर केली होती. नुकताच या संदर्भातील शासन निर्णय देखील आलेला आहे. मात्र या योजने अंतर्गत अनुदान येण्यासाठी आपण पात्र आहोत कि नाही या संदर्भात शेतकरी यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण हे अनुदान कोणास मिळणार आहे याची माहिती घेणार आहोत.

soyabeen cotton anudan किती मिळणार अनुदान

या मध्ये सरकारने जाहीर केले प्रमाणे कमीत कमी १००० रुपये तर जास्तीत जास्त १०००० हजार रुपये या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. आणि हे अनुदान देत असतांना. एका शेतकरी यांच्या नावे जास्तीत जास्त २ हेक्टर च्या मर्यादे मध्ये अनुदान वाटप केले जाणार आहे. आणि कमीत कमी रक्कम हि १००० रुपये पेक्षा कमी नसणार आहे. म्हणजे एकरी २ हजार रुपये लाभ मिळणार आहे.

 

soyabeen cotton anudan असे करा चेक करा अनुदान कोणाला मिळणार.

हे अनुदान मिळण्यासाठी फक्त २०२३ -२४ हंगाम मध्ये ज्यांनी पीक पाहणी करतांना कापूस व सोयाबीन या पिकांची नोंद केली होती असे शेतकरी या योजने अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी पात्र होणार आहेत.आता मागील हंगामा मध्ये पीक पाहणी कोणती केली होती या संदर्भा मध्ये आपणाला माहिती मिळत नाही. आता मागील हंगामा मध्ये आपण कोणेते पिकांची नोंद केली होती ते आपणाला सातबारा वर पाहावे लागेल त्या साठी नावीन सातबारा काढून घ्यावा व सातबारा वर नमुना बारा मध्ये मागील वर्षी घेतलेल्या पिकांची नोंद असते त्या नोंदी मध्ये कापूस व सोयाबीन हे पीक असेल तर आपण या अनुदान साठी पात्र आहोत. जर यावर कापूस व सोयाबीन पिकांची नोंद असेल तर आपण अनुदान मिळण्यास पात्र आहोत असे समजावे.

या पद्धतीने करा पीक पाहणी

ज्या शेतकरी यांनी मागील वर्षी शेती मध्ये पीक असताना देखील पीक पहाणी न केल्यामुळे ते अनुदान मिळण्यास पात्र होणार नाहीत. त्यामुळे शेतकरी यांनी येथून पुढे अनुदान मिळणे साठी पीक पाहणी चालू झाल्यनानंतर न विसरत पीक पाहणी करून घ्यावी.

Leave a Comment