MAHA- DBT PORTAL फवारणी पंप ऑनलाइन करण्यास मिळाली मुदत वाढ

MAHA- DBT PORTAL वर शेतकरी बांधवासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या मध्ये लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.सध्या कृषी विभागा मार्फत फवारणी पंप याकरिता अर्ज करणे सुरु आहे. मात्र साईट वर अचानक अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वर क्रॅश झाल्याने शेतकरी यांना अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे अर्ज करण्यास मुदत वाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची इच्छा होती.

MAHA- DBT PORTAL अर्ज करण्यासाठी मिळाली मुदत वाढ

पोर्टल वर फवारणी पंप यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ६ ऑगस्ट होती. मात्र साईट बंद पडल्याने शेतकरी यांना अर्ज करता येत नव्हते त्यामुळे साईट वर अर्ज करण्यास मुदत वाढ मिळावी अशी सर्वाना वाटत होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सुलभता व्हावे म्हणून १४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात अली आहे.

MAHA- DBT PORTAL अर्ज कसा करावा

सर्व प्रथम या साईट वर जा.

या अगोदर या पोर्टल वर फॉर्म भरला नसेल तर प्रोफाइल तयार करून घ्या.

यूझर आई ड टाकून पोर्टल वर लॉगिन करा.

समोर दिसणाऱ्या योजना पैकी कृषी यांत्रिकीकरण या घटका अंतर्गत मनुष्य चलित औजारे या घटक मधून फवारणी पंप या घटकाची निवड करा.

अर्ज सबमिट करून पेमेंट करा.
अशा प्रकारे शेतकरी फवारणी पंप यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यास मुदत वाढ मिळाल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होण्यास मदत मिळणार आहे. MAHA- DBT PORTAL

Leave a Comment