E-PIK PAHNI :खरीप हंगाम २०२४ साठी ई पीक पाहणी करण्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात अली आहे. पीक पाहणी करणे सर्व शेती काम करिता देणे गरजेचे असून सर्वानी हे पीक पेरा नोंद करणे गरजेचे आहे. जर आपण पीक पाहणी केली नाही तर आपली जमीन मध्ये पीक पेरणी केली नाही असे समजून शेत पडीक आहे. असे समजले जाईल म्हणून सर्वानी पीक पाहणी करून घ्यावी. हि पीक पाहणी कशी करावी हे आपण या मध्ये जाणून घेऊ.
E-PIK PAHNI पीक पाहणी करणे का गरजेचे आहे.
पीक पाहणी करणे हे आपण पीक विमा भरतो. त्या पीक विमा लाभ मिळणे साठी आवश्यक आहे . कारण पीक विमाचा लाभ मिळतांना आपण भरलेला विमा व पीक पाहणी करतांना नोंदवलेले पिकांमध्ये तफावत निर्माण होत असेल तर ई पीक पाहणी करतांना जे पीक नोंदवले आहे. ते पीक अंतिम गृहीत धरले जाते. तसेच आता शासनाने सोयाबीन कापूस या पिकासाठी जी मदत जाहीर केलेली आहे. ते मदत मिळवायची असेल तर ते पीक पाहणी केलेल्या पिकांच्या नोंदी आधारे मदत वाटप करणार आहेत. म्हणजे याहून आपणाला पीक पाहणीचे महत्व लक्षात येईल. पीक पहाणी करणे किती गरजेचे आहे ते या वरून लक्षात येईल.
पीक पाहणी कशी करावी.
पीक पाहणी हि आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी नावाच्या अँप मध्ये करावयाची आहे.
E-PIK PAHNI या पद्धतीने करा पीक पाहणी
१. सर्व प्रथम मोबाईल च्या प्ले स्टोर ला जाऊन ई पीक पाहणी हे ऍप डाउनलोड करून घ्या.
२. ऍप डाउनलोड करून त्यावर मोबाइल नंबर वर ओटीपी चि पडताळणी करून रेजिस्ट्रेशन करून घ्या.
३. ऍप ओपन केल्यानंतर आव्यश्यक त्या परमिसिन ऍप ला देऊन टाका.
४. त्या नंतर आपण ज्या महसुली विभागात मोडतो तो विभाग निवडा.
५. महसुली विभाग निवडल्यानंतर लॉगिन ची पद्धत यामध्ये शेतकरी व इतर असे विभाग दिसतील त्या मधील शेतकरी या ओप्टिव वर क्लीक करून समोर जा.
६. समोर गेल्यानंतर मोबाइल नंबर वर ओटीपी पाठून पडताळणी करावी लागेल.
७. गाव निवडण्याचं पर्यामध्ये जिल्हा तालुका गाव निवडून समोर जायचे आहे.
८. गाव निवडून समोर गेल्यानंतर खाते दार चे नाव निवडायचे आहे ते आपण पहिले नाव, मधले नाव , आडनाव तसेच गट नंबर टाकून निवडू शकतो.
९. हि सर्व माहिती भरल्या नंतर आपणास सहा पर्याय दिसतील. हे कायम पड चालू पड नोंदवा, पिकांची नोंद करा. बांधवारची झाडे नोंदवा अपलोड, पीक माहिती मिळवा . व गावाचे खातेदारची पीक पाहणी.
१०. यामधील पिकांची नोंद करा या ऑपशन वर क्लीक करून आपल्या शेती चे गट नंबर तसेच खाते नंबर अशी आव्यश्यक माहिती भरून. शेवटी पिकाचे दोन फोटो घेऊन माहिती सबमिट करावी अशा प्रकारे आपणाला पीक पाहणी करता येईल.
या पद्धतीने आपण स्वतः शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करावी म्हणजे आपणास विविध शेती वर संबंधित योजनांचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल.