solar user id recover: देशातील बहुतांश जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे. देशातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे थोडेफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे त्यांना पाणी असून देखील विजे अभावी सिंचन करता येत नाही. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे या सोयीकरिता शासनाने शेतकऱ्यांकरिता सौर ऊर्जा पंप योजना चालू केलेली आहे. राज्यामध्ये सौर पंप योजना राबविली जात आहे. अनेकांनी या योजने अंतर्गत फॉर्म देखील भरले आहे. मात्र सौर पंप फॉमर भरणे पासून ते पंप शेतामध्ये बसविण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे बहुतांश शेतकरी यांचेकडे फॉर्म भरताना आलेले आय डी पासवर्ड विसरुन जातो
solar user id recover सोलर ची स्थिती पाहण्यासाठी युजर आय डी ची गरज आहे
सोलर योजनेकरिता अर्ज नोंदणी करत असताना प्रत्येक शेतकरी यांना करता एक विशिष्ट क्रमांक दिला जातो त्यालाच MK-ID असे म्हंटले जाते किंवा आपल्या फॉर्म भरणे चा युजर आय डी म्हटले जाते. आता प्रत्येक फॉर्म भरणे साठी हा क्रमांक आव्यश्यक असतो. . हा युजर आयडी प्रत्येक शेतकऱ्यांकरिता वेगवेगळा असतो. या आयडीच्या सहाय्याने तसेच पासवर्ड च्या मदतीने शेतकरी आपल्या सौर ऊर्जा फॉर्मच्या सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊ शकतो त्याचप्रमाणे फॉर्मची प्रिंट देखील काढू शकतो. आणि हा आयडी सोलार फॉर्म भरते वेळेस जो मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या आहे त्या क्रमांकावर नोंदणी करते वेळेस पाठविला जातो.
solar user id recover आयडी हरवला आहे तर तो परत कसा मिळवायचा
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये नोंदणी करते वेळेस एम के आयडी चा मेसेज आलेला होता. मात्र शेतकऱ्याकडून अनावधानाने मेसेज डिलीट झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे एमके आयडी उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यामध्ये अडचण येत आहे तर हा एम के आयडी कसा मिळवायचा दोन पद्धतीने आपणाला परत मिळवता येतो.
1. त्यातील पहिली पद्धत म्हणजे सोलर योजनेच्या च्या साइटवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून युजर आयडी फॉरगेट करून आपणाला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज स्वरूपात पाठवला जातो.
2. दुसरी पद्धत म्हणजे कुसुम योजनेच्या बाबतीत आपण महा ऊर्जा महा उर्जा विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन आपण आधार नंबरच्या आधारे कोणत्याही शेतकऱ्यांचा MK-ID नंबर मिळवू शकतो.
3.एकदा USER ID मिळाल्यानंतर आपणास पासवर्ड फोरगेट करून पासवर्ड परत मिळवता येतो.
अशाप्रकारे ज्या शेतकऱ्याकडे युजर आय डी आयडी उपलब्ध नाही अशा शेतकरी वरील पद्धतीचा अवलंब करून आपला एम के आयडी मिळवू शकतात. आणि आपल्या सोलार फॉर्म ची सद्यस्थिती काय आहे याविषयीची माहिती जाणून घेता येईल .solar user id recover