pikvima status check खात्यावर विमा जमा झाला का या पद्धतीने करा चेक

pikvima status check : पीकविमा येणार की नाही या पदधतीनुसार करा चेक मागील वर्षीच्या रब्बी हंगाम मध्ये दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या भागामध्ये पिकांचे नुकसान झाले होते.  त्या नुकसाभरपाईची रक्कम  पीक वीमा भरलेल्या काही शेतकरी यांना मिळाली होती. तर आणखी काही शेतकरी हे लाभ  मिळण्याचा प्रतिक्षे मध्ये आहे. अशातच काही शेतकरी यांना रब्बी हंगाम मध्ये भरलेल्या विमा जमा झालेचे मेसेज आले आहेत. तर ज्या शेतकरी यांना मेसेज आले नाही ते शेतकरी विमा मिळणार आहे किंवा नाही या संभ्रमात आहेत. तर विमा मिळणार आहे की नाही हे चेक कसे करावे हे आपण या लेखात बघणार आहोत.

pikvima status check  पिक विमा येणार की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम 

मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांना फार मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी पिक विमा कंपनीकडून मदत मिळली आशेवर बसली होती मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना म्हणावी अशी मदत मिळाली नाही. मात्र अशातच काही शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भरलेल्या पिकांच्या मोबदल्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाल्याच्या संदर्भातील मेसेज आलेले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांनाही मेसेज अद्यापही आलेले नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले  नाहीत असे शेतकरी विमा मिळणार आहे की नाही या संभ्रमात पडले आहे.

pikvima status check या पद्धतीने  चेक करा पिक विमा येणार की नाही 

आपल्या खात्यामध्ये पिक विमा येणार की नाही हे आपणाला ऑनलाइन चेक करता येते. या साठी आपणाला पिक वीमा योजनेच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे साईटवर जावे लागेल. साइटवर गेल्यानंतर फार्मर कॉर्नर वर  क्लिक करून मोबाईल नंबर टाकून आपले व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपणाला ज्या वर्षीच्या  विम्या विषयी माहिती हवी आहे त्या वर्षीच्या विमा पावती वर असणाऱ्या ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. पिक विमा रक्कम येणार आहे किंवा नाही याविषयीची विस्तृत अशी माहिती  तेथे दर्शवली जाते. जर  त्या ठिकाणी रक्कम शून्य दर्शवली जात असेल तर आपणाला विमा मंजूर झाला नाही असा त्याचा अर्थ होतो. जर त्या ठिकाणी रक्कम दर्शवली जात असेल तर  तेवढ्या रकमेचा आपणाला मंजूर झाला असून लवकरच तो आपल्या खात्यामध्ये जमा होईल असेल  त्याचा अर्थ होतो.
 पद्धतीप्रमाणे आपण आपल्याकडे असलेल्या पावतीवरील नंबरच्या आधारे आपणास  विमा मंजूर झाला आहे की नाही याविषयीची स्टेटस आपण आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो.pikvima status check

Leave a Comment