Cotton anudan news : मागील हंगाम मध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले होते. तसेच पिकांना आव्यश्यक असा दार मिळाला नव्हता या वर उपाय म्हणून शासना मार्फत शेतकरी यांना काही रक्कम मदत म्हणून देणार आहे. परंतु हि मदत कोणाला मिळणार या बाबद शेतकरी यांच्यामध्ये शंका आहेत. या विषयीच्या याद्या देखील आल्या आहे. परंतु अनेकांना या यादी मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे पाहता येत नाही.
कोणते शेतकरी होणार अनुदानासाठी पात्र
मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकरी यांनी आपल्या सातबारा वर कापूस व सोयाबीन या पिकांची नोंद केलीय होती ते शेतकरी या योजने अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी पात्र राहणार आहेत. परंतु मागील वर्षी आपण पीक पाहणी केली होती किंवा नाही या विषयी काही शेत करी याना माहिती नाही तर असे शेतकरी यांनी मागील वर्षी चा पेरा असणारा सातबारा काढून त्या मध्ये आपण पिकांची नोंद केली आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. जर त्यामध्ये पिकांची नोंद असेल तर आपण अनुदानास पात्र आहे असे समजावे. जर त्यामध्ये नाव नसेल तर आपणाला अनुदान मिळणार नाही असे समजावे.
अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार
ह्या योजनेचे सोयाबीन कापूस या पिकाचे अनुदान मिळण्याकरता कुठलाही ऑनलाइन फॉर्म भरण्याची गरज नाही. या योजनेची पैसे हे मागील वर्षाच्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन या पिकांची पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे पडणार आहेत. काही ठिकाणी मागील वर्षी शेतकऱ्यांनी केलेली पिक पाहणी च्या संदर्भातील याद्या आलेले आहेत. मात्र आणखी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या याद्या आलेले नाहीत. शेतकरी आपल्याला अनुदान मिळणारी की नाही या संभ्रमात आहेत. याकरिता शेतकऱ्यांना एकच करायचे आहे मागील वर्षी आपण जी पीक पाणी केली होती त्यामध्ये जर आपण सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद जर केली असेल तर आपणाला या योजनेचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे पडणार आहेत. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त आपल्या आदर्श माहितीच्या वापर करण्याबाबत एक संमती पत्र कृषी सहायक यांच्याकडे भरून द्यावयाचे आहे. जर आपले खाते हे सामाईक असेल तर सामायिक संमती पत्र देखील त्यांच्याकडे जमा करावयाची आहे.
या योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार.
या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक असणारा बँक खात्यामध्ये जमा होणार असून. त्यामुळे आपल्याला कृषी सहाय्यक यांच्याकडे आधारच्या वापराबाबतची संमती पत्र सादर करावयाची आहे त्यानंतर आपल्या आधार लिंक खात्यामध्ये त्याचे पैसे जमा होणार आहेत.
अशा प्रकारची शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे आपल्या आधारच्या संमती बाबतचे पत्र कृषी सहायक यांच्याकडे जमा करावे. त्यामुळे लवकरच हे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.Cotton anudan news.