NAMO SHETKARI YOJNA : केंद्र शासनाने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेवर आधारित असलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना. राज्य शासनाने सुरू केलेल्या शेतकरी योजनेचा हप्ता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. मात्र हा हप्ता लवकरच येणार असून त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
NAMO SHETKARI YOJNA हप्ता वितरित होणार कि नाही या चर्चांना उधाण
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची केलेली योजना म्हणजेच पी एम किसान योजना. ही योजना लोकप्रिय झाल्यामुळे राज्य शासनाने देखील शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून वार्षिक सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी महासंन्मान योजनेची हप्ते परिणामी असल्यामुळे योजना बंद झाली की काय यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेली होती मात्र या संदर्भातील हप्ता वाटप संदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांना आता पूर्णविराम बसलेला आहे लवकरच या संदर्भातील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
NAMO SHETKARI YOJNA नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता लवकरच वितरित होणार.
2003 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत स्वरूपात भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. चौथा हप्ता कधी वितरित होणार याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून चौथा हफ्ता एप्रिल ते जुलै या कालावधी करिता 2041.25 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासंदर्भात तील शासन निर्णय जाहीर झालेला आहे. त्यामुळे लवकरच पात्र शेतकरी यांना या योजनेअंतर्गत येणारा चौथा हप्ता वितरित होणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची KYC केली कि नाही याबाबत खात्री करून घ्यावी. कारण KYC केली तरच शेतकऱ्यांना हे हफ्ते वितरित होणार आहे . आपली झाली आहे कि नाही याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकमध्ये आधारकार्ड टाकून सर्च करा.
पी एम किसान योजनेची KYC झाली कि नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा