MAZI LADKI BAHIN YOJNA : माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना वार्षिक 18000 रुपये मिळणार आहे. या योजनेचे फॉर्म भरणे सुरू आहे या योजने फॉर्म भरलेले आहेत त्यांची फॉर्म मंजुरी करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही कसे पहावे हे आज आपण या लेखा मध्ये बघणार आहोत.
महिलांना महिना पंधराशे रुपये लाभ देणारी योजना म्हणून माझी बाहिन लाडकी बहीण योजना सुरु करण्यात अली आहे. या योजने अंतर्गत नवीन फॉर्म भरणे सुरु आहेत. तसेच या योजने अंतर्गत हफ्ता पडण्याची तारीख देखील जाहीर करण्यात अली आहे. त्या मुले ज्यांनी या योजने अनुसार फॉर्म दाखल केले आहेत त्या फॉर्म ची पडताळणी आता सुरु करण्यात येत आहे. त्या नुसार काही फॉर्म मंजूर करण्यात आले असून ज्या प्रमाणे फॉर्म चेक केले जातील त्या नुसार फॉर्म मंजूर केले जाणार आहेत. काही फॉर्म हे इन प्रोसेस आहे असे दाखवत आहे. म्हणजे त्यांचे फॉर्म लवकरच मंजूर होणार आहेत.
MAZI LADKI BAHIN YOJNA आपला फॉर्म मंजूर झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला खालील स्टेप अवलंबव्या लागतील
1. सर्वप्रथम आपणाला नारीशक्ती दूत हे ॲप ओपन करावे लागेल.
2. ओपन करून त्यामध्ये लॉगिन करून घ्यावे लागेल.
3. ॲप ओपन होतात आपण त्या ॲप मध्ये भरलेले सर्व फॉर्म ची यादी दिसेल.
4. ज्या फॉर्म चे स्टेटस बघायचे आहे त्या फॉर्मवर क्लिक करून तो फॉर्म आपणाला ओपन करावा लागेल.
5. फॉर्म ओपन केल्यानंतर आपणाला त्या फॉर्म ची स्थिती दाखवली जाईल जर आपला फॉर्म मंजूर झालेला असेल तर(Approved) असा शेरा त्या फॉर्ममध्ये दिसेल. जर आपला फॉर्म प्रोसेस मध्ये असेल तर In Review तर काही महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत आहे.
हे फॉर्म भरणे सध्या नरी शक्ती दूत या अँप द्वारे भरणे सुरु आहे. तसेच या योजनेसाठी पोर्टल विकसित करण्यांत येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पर्यंत हे पोर्टल काही सुरु करण्यात आले नाही. मात्र तरी देखील नरी शक्ती दूत या अँप च्या माध्यमातून महिलांनी अर्ज केलेले आहेत. आणि लवकरच या अर्जा वर निर्णय घेतला जाईल. तो पर्यंत आपणाला प्रतीक्षा करावी लागेल.MAZI LADKI BAHIN YOJNA