MAHABHULEKH : शेतकऱ्याच्या मालकी हक्काचे महत्वाचे कागद म्हणून सातबारा कडे पहिले जाते . आज काल कोणत्याही शासकीय कामकाज असो किंवा कर्ज प्रकरण असो किंवा पीक विमा भरणा करणे असो या ठिकाणी सातबारा उतारा मागितला जातो तर या सातबारा उतारा या संदर्भांतील माहिती या लेखात बघणार आहोत.
MAHABHULEKH या कालावधी मध्ये बंद राहणार पोर्टल
मी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल हे अद्यावत करण्यात येणार असल्यामुळे ती दिनांक 19 जुलै च्यासायंकाळी ६ वाजेपासून ते २२ जुलै च्या रात्री १२ वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे. परिणाम तीन दिवसाच्या काळामध्ये सातबाराचें उतारे, आठ अ उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारा असे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करता येणार नाही.
MAHABHULEKH कशामुळे बंद राहणार तीन दिवस पोर्टल
ई फेरफार, ई हक्क, ई – तसेच महाभुलेख या पोर्टलवरून सातबाराचे उतारे, आठ -अ चे उतारा आणि अन्य शेती संबंधित कागदपत्रे ऑनलाईन डाउनलोड करता येतात या पोर्टलची सॉफ्टवेअर ही जुनी झाल्यामुळे हे पोर्टल जुने झाल्यामुळे पोर्टलच्या वेगावर मर्यादा येत आहेत त्यामुळेच 2024 मध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. तसेच या सॉफ्टवेअरच्या टेस्टिंगचे काम देखील अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि चाचणी देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. हे अद्यावत केलेले सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी महाभुलेखक तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती फेरफार प्रकल्पाची समन्वयक यांनी दिली.
सध्या पीकविमा भरणे चालू आहे त्यासाठी सातबारा उतारा लागतो. तसेच खरीप हंगामा साठी कर्ज प्रकरणे करणे याकरिता देखील सातबारा उतारा गरजेचा आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली गैर सोया होऊ नये या करिता आपले सातबारा उतारे गरजे नुसार काढून ठेवावेत म्हणजे तीन दिवस पोर्टल बंद असल्यामुळे आपल्या कामामध्ये अडथळा येणार नाही .