LADKI BAHIN SCHEME: महाराष्ट्र शासनची महत्वकांक्षी योजना माझी बहीण योजना या योजनेमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सर्व नागरिकांमध्ये कागदपत्रे कोणती जोडावी याकरिता संभ्रमावस्था आहे. या योजनेचे कागदपत्रे मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच काही कागदपत्रे आता जोडावयाची आवश्यकता नाही तर कोणते कागद पत्र कमी करण्यात आले इथे हे आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत .
योजनेच्या सुरवातीला या योजनेसाठी तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाण पत्र व तहसील कार्यालयांचे रहिवासी प्रमाणपत्र बंदनाकारक करण्यात आले होते. नागरिकांनी या कागदपत्रांसाठी प्रचंड प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये सेतू कार्यालया मध्ये गर्दी केली नागरिकांची होणारी घाई गरबड तसेच कागदपत्र काढण्या साठी होणारा लक्षात घेऊन शासनाने यामध्ये सुधारना केल्या आणि राशन कार्ड असणारे नागरिक तसेच ज्या व्यक्तीकडे राज्यातील १५ वर्षा पूर्वीचा रहिवासी पुरावा आहे. त्यांना या मधून सूट देण्यात आली. त्यामुळे नागरिक यांची योजने मध्ये फॉर्म भरण्या मध्ये अडचणी कमी झाल्या.
LADKI BAHIN SCHEME हे काम करा नाहीतर मिळणार नाही या योजनेचा लाभ
या योजने मध्ये लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावे वैयक्तिक बँक खाते असणे आवश्यक आहे. हे खाते आधार कार्ड ला लिंक केलेले असलेले पाहिजे तरच या योजनेचे पैसे लाभार्थी महिलेच्या खात्यावर पडणार आहे . म्हणजे सर्वाना खाते हे आधार कार्ड ला लिंक केले आहे का नाही हे तपासून पाहावे लागणार आहे. जर खाते लिंक नसेल तर या योजनेचे पैसे खात्यावर पडणार नाहीत. कारण या योजनेचे पैसे डबीत पद्धती द्वारे लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत .
या पद्धतीने करा बँक खाते आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही
जर आपणास जुने बँक खाते आधार कार्ड ला लिंक केले आहे किंवा नाही हे आठवत नसेल तर त्यासाठी अपनाला खालील पद्धतीने चेक करता येईल.
सर्व प्रथम आधार च्या साईट वर जा. आधार नंबर टाकून लॉगिन करा. ओटीपी टाकून लॉगिन करा. बँक मॅपिंग टू आधार लिंक वर क्लीक करा त्यामध्ये ज्या बँकेचे उल्लेख असेल ते खाते आधार कार्ड ला लिंक आहे असे समजावे.
येथे क्लीक करून चेक करा बँक खाते आधार कार्ड ला लिंक आहे किंवा नाही
माझी बहीण लाडकी बहीण योजने साठी लागणारे कागदपत्रे LADKI BAHIN SCHEME
१. आधार कार्ड.
२. उत्त्पन्न दाखल किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड .
३. जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र. हे कागदपत्र नसतील तर मतदान कार्ड किंवा राशन कार्ड वापरता येईल मात्र हे दोन्ही कागदपत्रे १५ वर्षा पूर्वीची पाहिजे.
४. महिलेचे बँक पासबुक.
५. पासपोर्ट फोटो.
वरील कागद पात्राच्या आधारे आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सहजतेने भरता येणार आहे.