GHARKUL YOJNA पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर

GHARKUL YOJNA पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी सदर योजनाही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत  योजनेच्या  धरतीवर राबविण्यात येत असल्यामुळे सदर योजने संदर्भात शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल त्या अटी शर्ती  लागू करण्यात आलेले आहेत.

GHARKUL YOJNA पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी एवढ्या निधी साठी मान्यता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनेअंतर्गत धनगर समाजातील गरजूंसाठी घरे बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या समिती जालना जिल्ह्यातील एकूण सहा हजार 943 वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आलेली आहे. तसेच यासाठी प्रति लाभार्थी 1.20 लक्ष रुपये व चार टक्के प्रशासकीय  निधी या प्रमाणे दिली याप्रमाणे अक्षरी 86 कोटी 64 लक्ष 86 हजार 400 रुपये इतका निधी वितरीत करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

GHARKUL YOJNA पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत घरकुल लाभार्थी यांना खालील अटी शर्ती चे पालन करन्याचा अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे

1. जिल्हास्तरीय समिती जालना यांनी पात्र ठरविलेल्या यादीमधील लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभ भेटेल.

2. सर्व लाभार्थी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील असणे बंधनकारक आहे अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल.

3. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या पालकांच्या नावात अथवा आडनावांमध्ये काही तफावत  असेल तर ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावासंबंधीचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील तसा पुरावा सादर न केल्यास  या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

4. शासन निर्णय यातील तरतुदी प्रमाणे सदर योजनेच्या लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तींनी देणे बंधनकारक असेल.

5. सदर योजनेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी तर योजनेतून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

6. सदर योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटी शर्तीची पूर्तता झाल्याची खतर जमा करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सहायक संचालक यांची राहील.

GHARKUL YOJNA घरकुल योजनेच्या लाभार्थीची यादी पाहण्या करीता येथे क्लीक करा

Leave a Comment