ANUDAN NEWS शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन पिकांना हेक्टरी अनुदान जाहीर 

ANUDAN NEWS : शेतकरी बांधवांसाठी खुशखबर कापूस सोयाबीन पिकांना हेक्टरी अनुदान जाहीर
राज्यामध्ये बहुतांश क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. मागील वर्षी अतिवृष्टी तसेच भावातील चढउतारामुळे  शेतकऱ्यांचे उत्पादकते वर परिणाम झाला होता. तसेच मागील वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देखील भावाच्या किमतीमध्ये घसरण झाली  त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. हे आर्थिक नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने शासनाने मदत देण्याची घोषाना केली होती.  त्यासंबंधीची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

ANUDAN NEWS पहा किती जाहीर झाली आहे मदत 

शेतकरी यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याच्या हेतूने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे.
या घोषणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडे 20 गुंठे असणाऱ्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये जास्तीत जास्त हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे.

पहा काय आहे शासन निर्णय 

1. राज्यातील सन 2023 खरीप हंगामा मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठे ते जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे.
2. म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 10000 रुपये इतकी भरपाई मिळणार  आहे.
3. याची भरपाई करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रू तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६.३४ कोटी एकूण 4194.68 कोटीच्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे. ANUDAN NEWS

कोणते शेतकरी होणार पात्र

1. राज्यातील जे शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक  पाहणी ॲप मध्ये पिक पाहणी करताना कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद केली आहे अशी शेतकरी या योजनेकरिता पात्र असतील.
2. ईपीक पाहणी अँप वर नोंद केलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या क्षेत्रानुसार  शेतकरी लाभासाठी पात्र राहतील.
3. सदर योजना ही सन 2023 च्या खरीप हंगाम पूर्ती  मर्यादित राहील.
4. सदर योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या योजनेची रक्कम जमा होणार आहे. ANUDAN NEWS

 

Leave a Comment