mahamesh yojna : भटक्या जमातींना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने शासन मार्फत शेळी मेंढी गट वाटप केले जाते. भटक्या जमाती क या प्रवर्गातील व्यक्तींसाठी 2017 -18 सालापासून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राज्यामध्ये राबवली जाते. ही योजना मुंबई व मुंबई उपनगरातील हे दोन जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. या योजनेमध्ये काही बदल करून या नवीन वर्षाकरिता 29.55 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्याची मुदत
या योजनेचे फॉर्म भरणे हे १२ सप्टेंबर पासून सुरु झाले असून २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
mahamesh yojna लाभार्थी निवडीचे निकष अटी शर्ती
- सदर योजना केवळ भटक्या जमाती क या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
- लाभधारकाचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
- लाभधारकाची निवड करत असताना एकूण कोठ्यापैकी महिला करतात 30 टक्के व अपंगा करिता 3 टक्के कोठा उपलब्ध करून दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत बचत गट तसेच पशुपालक उत्पादक कंपनी यांना प्राधान्य देण्यात येईल.
- ज्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे अशी लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
- कुटुंबातील एका व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करता येईल.
- पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत एखाद्या कुटुंबाला मिळाला असल्यास लाभ घेतलेल्या व्यक्तीला व त्या कुटुंबातील व्यक्तीला पुन्हा अर्ज करता येणार नाही .
- स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांकडे शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.
- शासकीय, निम शासकीय कर्मचारी स्थानिक स्वराज संस्थेच्या सेवेमध्ये असणारे सेवानिवृत्ती वेतनधारक, शासकीय पदांची लाभ घेणारी व्यक्ती तसेच केंद्र राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांची पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
mahamesh yojna योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला.
- आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
- आपत्य स्वयंघोषणापत्र.
- शेड बांधकामासाठी स्वतःची जागा असल्याचे पुरावा.
- वैरण उत्पादनाकरिता किमान एक एकर जमीन असल्याचा पुरावा.
- स्वतःच्या नावे जमीन असल्यास सातबारा उतारा किंवा स्वतःच्या नावे जमीन नसल्यास संमती पत्र देणारी व्यक्तीच्या नावे शेत जमिनीचा सातबारा उतारा व शंभर रुपयांच्या मुद्रांक वर नोटरी करून संमती पत्र .
- अर्जदार आणि जमीन भाडेपट्ट्याने घेतले असतात भाडेकरार नामा.
अशा प्रकारे भटक्या जमाती प्रवर्गातील व्यक्तींना या योजनेमुळे मदत होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावे. mahamesh yojna