Magel tyala solar yojana :मित्रानो सौर पंप च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी यांच्या साठी आनंदची बातमी आहे कि सौर पंप ची प्रतीक्षा लवकर चा संपणार आहे कारण राज्यासाठी आता मागेल त्याला सोलर पंप चा या योजने अंतर्गत नवीन कोटा सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात अली तर आपण याविषयी जाणून घेऊ यात.आता पर्यंत राज्य मध्ये कुसुम योजने अंतर गत पंप स्थपित करण्यात आले आहेत तर महावितरण मार्फत देखील काही पंप शेतकयांया वाटप करण्यात आले मात्र तरीही पंप ची संख्या तसेच शेतकऱ्याचे अर्ज या मध्ये फार मोठी तफावत आहे.
Magel tyala solar yojana योजनेची वैशिष्ट्ये
1.शेतकऱ्यांच्या जमिनी क्षेत्रानुसार तीन एचपी ते साडेसात एचपी पर्यंत पंप मिळणार.
2.पाच वर्षाच्या मेंटेनन्स ची हमी
3.विज बिलाची चिंता नाही.
4.शेतीला दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
5.सर्वसाधारण गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागणार तर अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावी लागणार.
Magel tyala solar yojana या पद्धतीने होणार लाभार्थी यांची निवड
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप,
- २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा
- ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच जास्त क्षेत्र असेल तर त्या शेतकरी यांना कमी अश्वशक्ती च्या पंप ची मागणी केल्यास त्याना तो पंप मिळेल
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. पाणी आडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत तयार केलेल्या साठ्यामध्ये या पंप ऑनलाईन करता येणार नाही.
Magel tyala solar yojana हि कागदपत्रे लागणार
1.शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे),
2.आधारकार्ड,
3.जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.
4.अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
-
अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.
या तारखेपासून करता येणार अर्ज
मागेल त्याला सोलर योजनेचे फॉर्म हे सप्टेंबर महिन्याच्या चोथ्या आठवड्यात म्हणजेच २५ ते २६ तारखेपासून सुरु होतील असा अंदाज आहे. तसेच याविषयी काही माहिती आल्यास आपल्यापर्यंत पोहचविली जाईल.
भारत सरकार डिझेल पंप व लाईट वर चालणारे पंप यावर पडणारा भार हळू हळू कमी करणार आहे त्यामुळे लाईट ची जोडणी देण्या ऐवजी सोलर चे वाटप वाढविण्या वर सरकार भर देत आहे त्या मुळेच सरकार सर्व लाईट वर भर कमी करण्यास प्रोत्साहन देत आहे व सोलर चे जोडणी वाढवत आहे.तसेच राज्यात विजेची मागणी जास्त प्रमाणात आहे आहे त्या प्रमाणात लाईट पुरवणे पेक्षा सोलर वर सर्वाना लाईट पुरवण्या वर सरकार भर देत आहे ह्या
कारणामुळे सरकार कोटा वाढवून सोलर पंप संख्या वाढविण्यावर भर देत आहे.