LADKI BAHIN YOJNA मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी सुधारणा

LADKI BAHIN YOJNA : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषनात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री लडकी बहीण योजना आहे ही दिनांक  28 जून 2024 पासून राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये महिलांना सहभाग घेण्यासाठी काही अटी आणखी सुधारणा करण्यात येत आहे कोण कोणत्या अटींमध्ये करण्यात आल्या आहेत ते आपण खालील लेखा मध्ये पाहणार आहोत.

LADKI BAHIN YOJNA काय आहे नवीन शासन निर्णय 

LADKI BAHIN YOJNA दिनांक पाच जुलै 2024 चा शासन निर्णय अनुसार A+,A व B महानगरपालिकांमध्ये वार्ड स्तरीय संरचना असल्याकारणाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये तालुका स्तरीय  समितीच्या ऐवजी वार्ड स्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच तांत्रिक अडीअडचणी यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी मा मुख्य  सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध  विभागांच्या सचिवांचा समावेश असलेली एम्पावर कमिटी ही दिनांक आठ जुलै २०२४ च्या शासन निर्णय अन्वये गठित करण्यात आलेली आहे. सदर एम पावर कमिटीच्या बैठकीमध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून

त्यामध्ये खालील प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत LADKI BAHIN YOJNA

1. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या ही कुटुंब याचा अर्थ पती-पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली असा राहील.
2. नवविवाहित महिलांच्या बाबतीमध्ये रेशन कार्ड नाव लगेच नाव लावणे शक्य नाही त्याकरिता विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून चालणार.LADKI BAHIN YOJNA
3. परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याची प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावी याशिवाय पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रोशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे
4.  सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट पोस्टातील बँकांचे खाते देखील ग्राह्य धरण्यात यावे.
5. योजनेच्या ऑफलाइन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावाम्हणजे पासपोर्ट फोटो देखील चालणार.
6.सुदर योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक,सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.
7. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ प्रणाली द्वारे देण्याची प्रक्रिया करण केलेली असून केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील म्हणजे जसे की PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण  योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा  डाटा माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची केवायसी व आधार व्हेरिफिकेशन अगोदरच झाले असल्यामुळे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाइन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभ घेण्यात यावा मात्र हे करताना लाभार्थी महिलांकडून सुधार योजनांचा अर्ज भरून घेण्यात यावा.
8. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ,तलाठी, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरिय कर्मचारी यांची एक ग्राम स्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक असतील तर सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील योजनेसाठी या समितीने गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पात्र महिलांची  नोंदणी करावी. LADKI BAHIN YOJNA
अशा प्रकारे शासन महिलांना जास्तीत जास्त अर्ज भारण्याचो प्रकिया सुलभ करत असून त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सहभागी होता येईल.

Leave a Comment