DEAR SISTER YOJNA मध्यप्रदेश राज्याच्या धरतीवर राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्या तर्फे माझी बहीण लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी ठरविण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत अर्ज मागविण्यात आली होती मात्र आता ती मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. गरीब व गरजू महिलांना ही योजना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र तसेच अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आली होती मात्र महिलांना कागदपत्राची जुळवा जुळव करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी केली त्यामुळे सर्व महिलांना यामध्ये सहभागी होता यावे याकरिता शासनाने सहभागी होण्या साठीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत कोण कोणते बदल झाले ते आपण या लेखामध्ये बघणार आहोत. DEAR SISTER YOJNA
सरकारकडून विद्यार्थी, शेतकरी, अल्पसंख्यांक समाज यासाठी विविध प्रकारच्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती माझी बहीण लाडकी बहिण या योजनेची. या योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी सर्वांनी तहसील कार्यालयांमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी केलेली आहे . मात्र काही वयस्कर महिलांकडे कागदपत्र पुरेसे नाहीत त्यामुळे सर्वांना या योजने सहभाग घेता यावा करिता या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार DEAR SISTER YOJNA
1. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी वयाची 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्ष या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
2. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.
3. सदर लाभार्थ्याची बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच बँक खात्याला आधार नंबर लिंक करणे आवश्यक आहे. म्हणजे थेट लाभ हस्तांतरण(DBT) योजनेअंतर्गत या योजनेतील दीड हजार रुपये लाभार्थी महिलेचे खात्यामध्ये येणार आहे.
4. जर लाभार्थी महिला केंद्र शासन किंवा राज्य शासानाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांतून 1500/- रूपयापेक्षा कमी लाभ मिळत असेल तर फरकाची रक्कम लाभार्थी महिलेला मिळेल.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही DEAR SISTER YOJNA
1.श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
2.केंद्र व राज्य शासन मार्फत राबिविली जाणारी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे हफ्ते येत असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.