राज्यात होऊ पाहणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थ संकल्पामध्ये विविध अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर या अर्थ संकल्प मध्ये कोणासाठी काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहू या .
MAHARASHTRA BUDGET कृषी क्षेत्रासाठी काय
1. राज्यातील कृषी पंपांचे वीजबिल वाढलेले असतांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात अली . सुमारे ४४ लक्ष शेतकरी यांना या योजनेचा फायदा होईल . ७. ५ हॉर्स पॉवर क्षमतेच्या कृषी पंप साठी १४७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येतील . तसेच विजेवरील भार कमी करण्याकरिता ८. ५ लक्ष सौर पंप देण्याची घोषणा करण्यात आली .
2. नैसिर्गिक आपत्ती मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी जुलै २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी रुपयांची मदत .
3.नोव्हेंबर – डिसेम्बर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस बाधित २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २२५३ कोटी रुपयांची मदत.
4.नुकसान क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टर वरून वाढून ३ हेक्टर पर्यंत वाढवून वाढीव निधी वाटप .
5.खरीप हंगाम २०२३ मध्ये ४० मंडळामध्ये दुष्काळ तर १०२१ महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती लागु करून निधी वाटप .
6.नुकसानीचे पंचनामे जलद होण्यासाठी ई -पंचनामा प्रणाली लागू .
7.नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना ५३१८ कोटी ४७ लाख अनुदान .
8.महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परत फेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार पात्र शेतकऱ्यांना सुमारे ५२०० कोटी रुपये मदत वाटप व उर्वरित रकमेचे वाटप देखील लवकरच होणार .
9.नानाजी देशमुख कृषी सांजवनी योजनेचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यात राबवला जाणार .
10.राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य पुरुस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेती उपयोगी यंत्र खरेदी साठी शेतकऱ्यांना अनुदान .
11.गाव तिथे गोदाम योजने अंतर्गत १०० नावीन गोदामाचे बांधकाम होणार तशेच आधीच्या गोदामांची दुरुस्ती होणार.
12कापूस सोयाबीन अन्य तेल बिया यांच्या मूल्य साखळी विकासाठी ३६१ कोटी रुपयांचा निधी .
13.खरीप पणन हंगाम २०२४ -२५ मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५००० रु हे रुपयांचे २ हेक्टर मर्यादेत वाटप होणार.