Kusum solar mk id कुसुम सोलार एम के आय -डी हरवला आहे. या सोप्या पद्धतीने काढा ऑनलाईन

Kusum solar mk id : देशातील बहुतांश जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे. देशातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे थोडेफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे त्यांना पाणी असून देखील विजे अभावी सिंचन करता येत नाही. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे या सोयीकरिता शासनाने शेतकऱ्यांकरिता सौर ऊर्जा पंप योजना चालू केलेली आहे.

Kusum solar MK-ID काय आहे 

कुसुम सोलर योजनेकरिता अर्ज नोंदणी करत असताना प्रत्येक शेतकरी करता एक विशिष्ट क्रमांक दिला जातो त्यालाच MK-ID असे म्हंटले जाते. हा एम के आयडी प्रत्येक शेतकऱ्यांकरिता वेगवेगळा असतो. या आयडीच्या सहाय्याने तसेच पासवर्ड च्या मदतीने शेतकरी आपल्या सौर ऊर्जा फॉर्मच्या सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊ शकतो त्याचप्रमाणे फॉर्मची प्रिंट देखील काढू शकतो. आणि हा आयडी सोलार फॉर्म भरते वेळेस जो मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या आहे त्या क्रमांकावर नोंदणी करते वेळेस पाठविला जातो.

 

Kusum solar mk id  आयडी हरवला आहे तर तो परत कसा मिळवायचा

बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये नोंदणी करते वेळेस एम के आयडी चा मेसेज आलेला होता. मात्र शेतकऱ्याकडून अनावधानाने मेसेज डिलीट झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे एमके आयडी उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यामध्ये अडचण येत आहे तर हा एम के आयडी कसा मिळवायचा दोन पद्धतीने आपणाला परत मिळवता येतो.

1. त्यातील पहिली पद्धत म्हणजे सोलर च्या साइटवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून युजर आयडी फॉरगेट करून आपणाला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज स्वरूपात पाठवला जातो.

2. दुसरी पद्धत म्हणजे महा ऊर्जा महा उर्जा विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन आपण आधार नंबरच्या आधारे कोणत्याही शेतकऱ्यांचा MK-ID नंबर मिळवू शकतो.

 

अशाप्रकारे ज्या शेतकऱ्याकडे एम के आयडी उपलब्ध नाही अशा शेतकरी वरील पद्धतीचा अवलंब करून आपला एम के आयडी मिळवू शकतात. आणि आपल्या सोलार फॉर्म ची सद्यस्थिती काय आहे याविषयीची माहिती जाणून घेता येईल .Kusum solar mk id

Leave a Comment