free electricity scheme आता शेतीला मिळणार मोफत वीज

free electricity scheme  :राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनामार्फत योजना राबविल्या जातात. शेतीच्या उत्पन्न वाढीमध्ये महत्त्वाची बाब असते ती म्हणजे त्यांना सिंचन करणे. या सिंचनासाठी शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते शेतकऱ्यांना रात्री बे रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचणी खूप शासनामार्फत त्यांना मागेल त्याला सौर पंप तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना  2024 जाहीर केली आहे .

free electricity scheme शेती मध्ये विजेची आवश्यकता

भारतातील शेती मुख्यता  पावसावर अवलंबून आहे. तशी इच्छा शेतकऱ्यांना थोडीफार पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना सिंचनाकरिता अवलंबून राहावे लागते मात्र मागणीपेक्षा विजेची निर्मिती कमी असल्याकारणाने शेतीला पूर्ण वेळ उपलब्ध राहत नाही परिणामी शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावयास जावे लागते. तसेच शेती हा व्यवसाय निसर्गाचे लहरीपणामुळे अडचणीत आलेला आहे त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. शेतकऱ्यांची उत्पन्न बाजार आल्यानंतर त्याला योग्य असा बाजार भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना घोषित करण्यात आलेली आहे.

free electricity scheme  मुख्यमंत्री बळीराजा योजना

मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही पुढील पाच वर्षासाठी एप्रिल  2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यावर येणाऱ्या विजेच्या बिलाचा भार कमी करण्याचे शासनाने ठरविलेले असून 7.5 आश्र्वशक्ती पर्यंतच्या शेती पंपांना वीज मोफत पुरवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे 45 लाख शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

कृषी क्षेत्रामध्ये होणारा विजेचा वापर

 राज्यातील एकूण विद्युत ग्राहकापैकी 16%  ग्राहक कृषी पंपाचे ग्राहक असून ऊर्जेच्या वापरापैकी 30 टक्के वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. सध्या कृषी ग्राहकांना रात्रीच्या काळामध्ये दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेचा चक्रकार पद्धतीने वीज पुरवठा  केला जातो. ही योजना पाच वर्षाच्या कालावधी असली तरी मध्ये या योजनेचे पुनरावलोकन करून हे योजना राबवण्याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जाईल.
           शासनास विद्युत अधिनियम 2003 च्या कलमा अन्वये कोणत्याही ग्राहकांना किंवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित दराने ग्राहक बिल लागू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याच अधिकारांचा वापर करू शासनाने ही सवलत कृषी क्षेत्रासाठी लागू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा बिल भरण्याचा भार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळनार आहे.free electricity scheme

Leave a Comment