soybeen hami bhav : मागील वर्षी शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता हातामध्ये रक्कम शिल्लक पण राहिली नाही. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्रालयाने महाराष्ट्रासह कर्नाटक मध्ये देखील महिने सोयाबीन आणि उडीद पिकांची खरेदी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
soybeen hami bhav समर्थन मूल्य योजनेअंतर्गत होणार खरेदी
महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यामध्ये समर्थन मुल्य या योजनेअंतर्गत सोयाबीन आणि या उडीद पिकाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू राहतील. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल या हेतूने भाव पडल्यानंतर कमी दराने माल विक्री करावी लागू नये याकरिता शासनाकडून 4892 इतक्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या पाठ पुरव्याला यश आले असून शेतकऱ्यांना तीन महिन्यापर्यंत सोयाबीन हमीभावाने विक्री करता येणार आहे.
मागील वर्षीच्या सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी अनुदान जाहीर.soybeen hami bhav
मागील वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनातर्फे भावांतर योजना अंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये पर्यंत मदत व तो जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत जाहीर केलेली आहे. आणि लवकरच संदर्भातील मदत शेतकऱ्यांचा आधार संलग्नित खात्यात जमा करण्यात येणार आहे.
सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यासंदर्भात केंद्र सुरू करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.soybeen hami bhav