solar update : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्यामध्ये कुसुम सोलर योजना सुरु करण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळावी या करिता राज्य सरकार प्रयन्त शील असून शेती करिता वीज उपलब्ध व्हावी याकरिता राज्यामध्ये सोलर संबधी विविधं योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्य मंत्री सोलर योजना, अटल सोलर योजना तसेच आता सुरु असलेली कुसुम सोलर योजना असे काही नावे आपणाला सांगता येतील तसेच महावितरण कडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना विजेच्या कोटेशन ऐवजी सोलर अशा विविध प्रकारच्या योजना द्वारे शासन शेतकऱ्यानं शेती साठी वीज उपलब्ध करून देत आहेत.
solar update सोलर चे मेसेज येण्यास सुरवात
सोलर पंप मिळावे याकरता कुसुम सोलर या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत असे शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. अशा शेतकऱ्यांना महावितरण योजना अंतर्गत एमएसआईडी वितरित करून त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी चे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फॉर्म भरताना अनेक चुका केलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे फॉर्म रद्द देखील करण्यात येत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म हे त्रुटी मध्ये आहेत असे शेतकऱ्यांना त्यामधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात मेसेज पडत आहेत.
solar update या पद्धतीने करा सेल्फ सर्व्हे
महावितरण योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सोलर चे पेमेंट करण्या संबधी मेसेज आले आहे . अशा शेतकऱ्यांना अगोदर सेल्फ सर्वे करून घ्यावा लागेल. सेल्फ सर्वे केल्या नंतर शेतकऱ्यांना पेमेंट भरता येईल तर सेल्फ सर्वे कसा करावा तसेच पेमेंट कसे करावे याची थोडकयात माहिती खालील प्रमाणे आहे.
१. सर्व प्रथम Play store var जाऊन हे kusum beneficiary he अँप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या.
२. अँप इन्स्टॉल केल्यानंतर फॉर्म भारतानं जो मोबाइल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर द्वारे रेजिस्ट्रेशन करून घ्या.
३. रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर अँप ओपन होईल. अँप मध्ये विविध प्रकारचे ऑपशन दिसतील त्यापैकी अँप्लिकेशन डिटेल या ऑपशन वर गेल्यानंतर अर्ज दाराची संपूर्ण माहिती ओपन होईल.
४. अर्ज दाराची माहिती ओपन झाल्यानंतर आपणास सेल्फ सर्वे साठी तीन फोटो काढायचे आहेत
5. एक फोटो आपणास सिंचन स्रोत जे असेल ते म्हणजे विहीर असेल किंवा बोअरवेल्स जे असेल त्याचा घ्यावयाचा आहे. दुसरा फोटो आपणाला सिंचन स्रोतासोबत शेतकऱ्याला उभा करून घ्यायचा आहे. तिसरा फोटो हा क्षेत्रामध्ये आपण सोलार पंप ऑनलाईन केलाय क्षेत्राचा एक फोटो अपलोड करायचा आहे.