PM- KISAN YOJNA राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना म्हणजेच पीएम किसान योजना. या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र शासनातर्फे 6000 आणि राज्य शासना मार्फत सहा हजार रुपये मानधन दिले जात आहे. म्हणजे शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12 हजार रुपये मानधन शासनाच्या माध्यमातून दरवर्षी दिले जात आहे.
परंतु या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी नवीन लाभ मिळण्यासाठी अनेक शेतकरी नोंदणी केली होती परंतु त्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही.तसेच यापूर्वी काही शेतकऱ्यांना नियमितपणे पीएम किसान निधीचे हप्ते मिळत होते परंतु काही शेतकऱ्यांची हप्ते मिळणे बंद झाले आहेत. या योजनेमध्ये काही शेतकऱ्यांना हप्ते येत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांना ते मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहेत तसेच काही शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी करावयाची आहे तसेच काही शेतकऱ्यांना नोंदणी करून देखील आतापर्यंत हप्त्याची रक्कम मिळालेली नाही.
त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.ही योजना सुरू झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी नवीन शेत जमीन खरेदी केली आहे . व काही शेतकऱ्यांची जमिनीची हिस्से झाले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यासाठी नवीन नोंदणी करू इच्छितात अशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करण्यासंदर्भाचे काय नियम आहेत या संदर्भाची माहिती आपण घेणार आहोत.
तसेच काही शेतकऱ्यांचे चालू असणारे पीएम किसान योजनेचे हप्ते बंद झाले आहेत किंवा काही शेतकऱ्यांना हे हप्ते समोर चालू ठेवायचे असतील तर त्यासाठी काय करावे लागणार आहे या संदर्भात माहिती आपण बघणार आहोत.
सन 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात झाली होती. त्यावेळेस ही योजना सुरू झाली होती त्या योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये 2020 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि पूर्वी अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी चालू असलेली ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली.
PM- KISAN YOJNA या योजनेअंतर्गत कोण पात्र ठरविण्यात आले आहेत.
1.फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत म्हणजे ती 2019 पूर्वी शेत जमिनीचे मालक आहेत अशा सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एका व्यक्तींना पात्र करण्यात आलेली होती यामध्ये एक कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि त्यांचे 18 वर्षे खाली मुले यांचा त्याने एक कुटुंबामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये मध्ये दोन मुले असतील एक मुलगा अठरा वर्षाच्या वर असेल व त्याच्या नावावर शेत जमीन असेल तर त्याला त्याला पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करता येईल.तसेच त्या कुटुंबातील एका व्यक्तीला अशा प्रकारे दोन व्यक्तींना नोंदणी करता येईल.
एक कुटुंब म्हणजे पती-पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील मुले यांना एक कुटुंब म्हणून वार्षिक सहा हजार रुपये दराने अनुदान दिले जाईल.
2.त्याला भारताचे फेब्रुवारी 2019 पूर्वीचे फेरफार आहेत तसेच 2019 पूर्ण त्याचे वय 18 वर्षे पूर्ण होत आहे असे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले आहेत.
PM- KISAN YOJNA या योजनेअंतर्गत कोण अपात्र ठरविण्यात आले आहेत.
1.यामध्ये माजी मंत्री, जिल्हा परिषद चे अध्यक्ष, इतर काही लोकप्रतिनिधी.
2.सरकारी कर्मचारी ज्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे.पेन्शनधारकांना देखील या योजनेतून उघडण्यात आलेली आहे ज्या पेन्शन धारकाची पेन्शन 25 हजारापेक्षा जास्त आहे. अशा पेन्शन धारकांना यामधून वगळण्यात आलेली आहे यामध्ये ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे.
3.इन्कम टॅक्स चा भरणा करणारे व्यक्ती यांना देखील या योजनेतून वगळण्यात आले आहे.
अशाप्रकारे विविध अटी शर्तीच्या अधीन राहून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी करायची आहे. जर तुमच्याकडे 2019 पूर्वीचा फेरफार असेल आणि तुम्ही यापूर्वी या योजनेच्या लाभ घेतला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
जर एखादा पी एम किसान योजनेचा लाभार्थी मरण पावला असेल तर, लाभार्थ्याचे हे वारसदार पीएम किसान ची नोंदणी करू शकतात.
काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते नियमितपणे येत होते परंतु त्यामध्ये आता ती बंद झाली त्याची कारणे खालील प्रमाणे. PM- KISAN YOJNA
1.इन्कम टॅक्स चा भरणा करणारे व्यक्ती.