Pikvima update खरीप 2023 मधील पीक विम्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विम्याची रक्कम वितरण होईल असे सर्वांना अपेक्षा होती मात्र आचारसंहितेमुळे यामध्ये थोडा विलंब झाला आहे. कारण त्या संदर्भातील निकष बदललेले आहेत तसेच वेगवेगळ्या विभागामधील पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पिक विमा वाटप करणे अपेक्षित होते. पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले नाही. सध्या लोकसभा निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेप्रमाणे टप्प्याटप्प्याने निवडणुका होतील तसे पीक विमा वाटप होईल अशी अपेक्षा होती , मात्र त्याप्रमाणे पिक विमा वाटप झाले नाही. मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.
Pikvima update कोणत्या शेतकऱ्यांना होणार पीक विम्याचे वाटप.
यापूर्वी ज्या भागांमध्ये अधिसूचनेनुसार नुसार 25% पीक विमा वाटप झालेले आहेत त्याच भागात उर्वरित समायोजनाचा 75 % रकमेचा पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
जर यापूर्वी तुम्ही 25% च्या सूचनेनुसार पीक मिळण्यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला उर्वरित समायोजनाचा 75 टक्के रकमेचा पिक विमा मिळेल. त्यानुसार 75 टक्के नुसार होणारी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.Pikvima update
विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप हंगामामध्ये विविध पिकासाठी पिक विमा क्लेम करण्यात आले होते. या क्लेममधून ज्या शेतकऱ्यांची क्लेम पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना यापूर्वी 25% सूचनानुसार पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली होती. परंतु सेटलमेंट नुसार किंवा काही नियमात बदल झाल्यामुळे, बाकी असणारी उर्वरित समायोजनाची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
विमा सरसकट मिळणार का ?
याचबरोबर पिकांचे अंतिम अहवाल प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने शासनास प्राप्त झालेली आहेत. आणि त्यानुसार जी महसूल मंडळे पिक विमा साठी पात्र आहेत त्या मंडळांना पिक विम्याचे वाटप होणे गरजेचे आहे. आणि त्यानुसारच पिक विम्यासाठी पात्र होणाऱ्या महसूल मंडळांना पिक विमा सरसकट मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्या भागामधील
यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे ज्या भागांमध्ये कपाशी तुर, मूग ,उडीद, सोयाबीन, या प्रकारच्या पिकांचे पीक कापणी अहवाल प्राप्त झाले आहेत. जे जे मंडळ यामध्ये पात्र झाले आहेत त्या त्या मंडळाचे पिक विमा वितरित होतील. परंतु तूर्तास तरी ज्या महसूल मंडळामध्ये अधिसूचनेद्वारे 25% रक्कम वितरित झालीआहे अशा मंडळातील उर्वरित पिक विमा वितरित करण्याची प्रक्रिया चालू आहे. पिक विमा विचारीत करण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका बारामती तालुका तसेच मराठवाड्यातील जालना जिल्हा तसेच इतर काही जिल्ह्यामधील अधिसूचना काढली होती त्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची वाटप चालू आहे.Pikvima update मोठ्या प्रमाणावर पिक विमा वितरणाच्या प्रतिक्षेत असलेले जिल्हे म्हणजे नाशिक, सोलापूर, अहमदनगर बहुतांश भागांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.