Pik vima राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे ते खरीप पीक विमा 2023 च्या वाटपाकडे.
अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा विमा वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु पीक विमा कंपन्या पीक विमा कंपन्या वेगवेगळी करणे देऊन शेतकऱ्यांचा विमा वाटपासाठी विलंब करत आहे तर काय आहे त्या मागील कारण पाहूया सविस्तर खालील प्रमाणे.
काही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विम्याच्या संदर्भात अग्रीम 25% पीक विम्याचे वाटप झालेला आहे. तर शेतकरी उर्वरित 75 टक्के पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भामध्ये प्रतीक्षेत आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये आणखी अग्रीम पीक विम्याची वाटप झाली ना 75 टक्के उर्वरित पीक वीमा वाटप झाला किंवा हंगामाच्या शेवटी महसूल विभागाच्या अहवालानुसार मिळणारा सरसकट विमा या कशाचेच वाटप पीक विमा कंपनीच्या मार्फत करण्यात आली नाही.
आणि याच अनुषंगाने शेतकऱ्याचा पिक विमा वाटप अडकली कशामध्ये हा एक प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे त्या विमा संदर्भात सरकार देखील उदासीन आहे. तसेच पीक विमा कंपन्या वाटपाच्या संदर्भात विविध कारणे पुढे करून विमा वाटपामध्ये टाळाटाळ करत आहेत.
पिक विमा वाटप मधे विलंब होण्याची कारणे
1.नुकसान भरपाई चे निकष ठरविण्यात आले नाहीत.
2.नुकसान भरपाई चे धोरण ठरवण्यात आले नाही.
3.शासनाने पिक विमा कंपनीला शासनातर्फे दिला जाणारा हप्ता जमा करण्यात आलेला नाही.
4. सध्या चालू असलेल्या निवडणुका.
Pik vima खरीप हंगाम 2023 यामध्ये राज्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले होते
आणि त्या संदर्भात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांची पैसेवारी ही 50 पैशापेक्षा पेक्षा कमी दर्शविण्यात आली होती.
याच धरतीवर खरीप हंगामातील जुलै महिन्यामध्ये तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर अशा प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती यामुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळेल व मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची वाटप होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती.
Pik vima विमा वाटपाची सध्यस्थिती
मार्च महिन्याच्या अखेरीस शासनाकडून विमा वाटपाच्या संदर्भात धोरण जाहीर करण्यात आल्यानंतर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विम्याची रक्कम वाटप होईल या प्रतीक्षेत शेतकरी होते. मात्र या संदर्भात शेतकऱ्यांची घोर अशी निराशा पदरी पडलेली आहे.
शासनाने पिक विमा कंपनीला शासनातर्फे दिला जाणारा हप्ता देखील जमा करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या हिस्साचा जो निधी आहे तो देखील पिक विमा कंपनीकडे वितरित करण्यात आलेला आहे. मात्र कंपन्यांकडून केंद्र शासनामार्फत दिल्या जाणार विमा हिस्सा बाकी आहे याचे कारण पुढे करून पीक विमा वाटपामध्ये टाळाटाळ केली जात आहे.Pik vima
शासनाकडे उपलब्ध झालेल्या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जी महसूल मंडळी पिक विमा साठी पात्र झाले आहेत अशा महसूल मंडळांमध्ये सरसकट पिक विमा वाटपासाठी निर्देश देणे गरजेचे आहे. यामध्ये 25% रक्कम वाटप झाले आहे त्या शेतकऱ्यांचा उर्वरित 75 टक्के विमा वाटप तसेच ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा विमा भेटला नाही. त्या शेतकऱ्यांना पीक कापणी अहवालाच्या आधारे सरसकट पीक विमा भेटणे गरजेचे आहे. त्या संदर्भातील सख्त निर्देश कंपन्यांना देऊन त्यांना वीमा वाटप करण्यात भाग पाडले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप वेळेवर झाले खरीप हंगाम 2024-25 यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे खत खरेदी साठी थोडाफार हातभार लागण्यास मदत होईल.Pik vima