PIK VIMA एक रुपयात भरा खरीप पीकविमा

PIK VIMA प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी पिक विमा योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जाते. शेती हा निसर्गवर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नेहमी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. या होणाऱ्या अडचणीतून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार देणे साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते त्या संदर्भात माहिती आपणास पाहणार आहोत.

PIK VIMA   सर्वसमावेशक पीक विमा योजना

प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यामध्ये 2016 मध्ये सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल 80:110 अनुसार 2025 -26 सालापर्यंत राबवण्यात येत आहे. सदर योजना ही आधीसुचित क्षेत्रामधील पीक हा घटक केंद्रस्थानी धरून राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी दोन टक्के तसेच रब्बी हंगामासाठी दीड टक्के व खरीप व रब्बी हंगामा मधील नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादित असा विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे. परंतु सन 2023 24 सालापासून सर्व समावेशक पीक योजना राबविण्याचा सरकार मार्फत घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया विमा हप्ता भरून शेतकरी पोर्टलवर अर्ज भरू शकतात. निश्चित करण्यात आलेला पिकनिहाय विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरवण्याचा शेतकऱ्यांनी भरावयाचा एक रुपया वगळता बाकीचा विमा हप्ता केंद्र सरकार मार्फत अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे.PIK VIMA

 योजनेचे उद्दिष्ट CROP INSURANCE

1.नैसर्गिक आपत्ती कीड रोगासारख्या परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे.
2.शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
3.पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांचे आर्थिक सस्थैर्य अबाधित राखणे.

योजनेची वैशिष्ट्ये

1.सदर योजना ही अधिसूचित केलेले पिकासाठी लागू आहे.
2.सदर योजना ही कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकरी यांना लाभ घेण्यासाठी ऐच्छिक आहे.
3.कुळाने तसेच भाडेपट्ट्या आणि शेती करणारे शेतकरी देखील या योजने करिता पात्र आहेत.
4.शेतकऱ्यांना विमा हप्त्यासाठी प्रति पीक एक रुपया भरावा लागणार आहे.
5.या योजनेनुसार सर्व अधिसूचित पीका करिता जोखीम स्तर हा 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे.
6.अधिसूचित क्षेत्रामधील पिकाचे उंबरठा उत्पादन ही मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पादन लक्षात घेऊन निश्चित केले जाईल.

विमा संरक्षण कोणत्या बाबीसाठी लागू असेल.

1. हवामान प्रतिकूलतेमुळे पिकाची लावणी किंवा पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
2. प्रतिकूल परिस्थितीत होणारे पिकांचे नुकसान.
3. पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक पनें लागलेली आग, पुर, पाणी साचणे, वीज कोसळणे, वादळ वारे आदी सारख्या घटना मुळे हंगामाच्या शेवटी होणारी उत्पादनातील घट.
4. स्थानिक  आपत्तीमुळे होणारे नुकसान.
5. काढणी पश्चात पिकांचे नैसर्गिक कारणामुळे होणारे नुकसान.

आव्यश्यक कागदपत्रे
सातबारा
आठ-अ उतारा
आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
पीक पेरा स्वयं घोषणापत्र
पीकविमा खरीप हंगाम 2024 वर्षा करिता नोंदणी करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै हा आहे.अंतिम तारखेला होणारी गर्दी तसेंच साईट वर ताण पडून होणारे सर्व्हर डाउन या समस्या मुले शेतकरी यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता विमा भरून घ्यावा .
योजनेत समाविष्ट पिके PIK VIMA
तृणधान्य व कडधान्य पिके भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मक्का
गळीत धान्य पिके भुईमूग तीळ सोयाबीन
नगदी पिके कापूस खरीप कांदा. PIK VIMA

Leave a Comment