DBT YOJNA डीबीटी योजनेमध्ये सुधारणेच्या हालचाली

DBT YOJNA आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो कृषिप्रधान देश असल्यामुळे येथील बहुतांश लोक हे उपजीविका करण्यासाठी शेती वर विसंबून आहेत. तसेच शेतकरी यांनी मदती साठी अनेक शेत मजुर शेती काम करीत मदत करत असतात, अशा या शेती वर देशातील बहुतांश जनतेचे भाकर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील संपूर्ण गावगाडा हा शेती वर अवलंबून आहे. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान चांगले आहे असे म्हणायला हरकत नाही .

अशा शेती व्यवसायाला ग्रामीण भागात दुर्लक्ष करून चालत नाही. अश्या शेती मध्ये नवनवीन प्रयोग शासन नेहमीच करते. असेच शेती उत्त्पन्न वाढ होण्या साठी शेती मध्ये विविध प्रयोग करून पाहणे तसेच भांडवली गुंतवणूक करणे गरजेचे आहे. परंतु शेती हि पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी हि भांडवली गुंतवणूक करू शकत नाहीत. तसेही देशामध्ये अल्प भू धारक शेतकरी यांचे प्रमाण हे बहू भू धारकांच्या मानाने जास्त आहे.  त्यामुळे , शेतकरी यांना
भांडवली गुंतवणूक करणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही तसेच ते व्यावहारिक दृष्ट्या देखील परवडत नाही.DBT YOJNA

त्यामुळे शेतकरी यांना शेती मध्ये विविध तंत्र ज्ञान वापरून उत्पन्न वाढ करता यावी ह्या हेतू समोर ठेवून शेती संबधी सर्व योजना एकत्रित करून एकच पोर्टल मार्फत सर्व योजनेचा लाभ देणे साठी महा -डी बी टी पोर्टल शासनाने सुरु केले आहे. यामध्ये शेती संबंधीच्या सर्व योजना साठी एकच साईट असून वेगवेगळे अर्ज करण्यासाठी एकाच साईट वर सुविधा उपलब्द करून देण्यात अली आहे .DBT YOJNA

DBT YOJNA अर्ज कसा करावा

१. अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम या साईट वर जावे
२. साईट वर जाऊन आधार कार्ड च्या आधारे नोंदणी करून घ्यावी .
३. नोंदणी झाल्या नंतर सर्व माहित भरून घ्यावी
४. सर्व माहिती भरून झाल्या नंतर भरलेल्या माहितीच्या आधारे विविध योजना दिसतील.
५. समोर दिसणाऱ्या योजना मधून आव्यश्यक योजनांची निवड करून घ्यावी.
६. सर्व योजना निवडून झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा .

DBT YOJNA कागदपत्रे कोणती लागतात

१. सातबारा उतारा
२. आठ अ चा उतारा
३. आधार कार्ड
४. खाते पुस्तक
कोण कोणत्या योजना करीत अर्ज करता येतो
या मध्ये यांत्रिकीकरण या घटक अंतर्गत
ट्रॅक्टर या घटक साठी अर्ज करता येतो . यामध्ये ८ ते ३० एच. पी ३१ते ४० एच. पी ४१ ते ७० एच. पी अशा तीन प्रकारामध्ये ट्रॅक्टर घेता येतो

DBT YOJNA कृषी यंत्र औजारे खरेदी साठी अर्थ साहाय्य या घटांतर्गत खलील बाबी करीत लाभ दिला जातो

 

१. काढणी पश्चात तंत्रज्ञान

२. ट्रॅक्टर
३. ट्रॅक्टर चलित औजारे
४. पवार टिलर
५. बैल चलित औजारे
६. मनुष्य चलित औजारे
७. सयंचलित औजारे
ट्रॅक्टर या घटक साठी अर्ज करता येतो . यामध्ये ८ ते ३० एच. पी ३१ते ४० एच. पी ४१ ते ७० एच. पी अशा तीन प्रकारामध्ये ट्रॅक्टर घेता येतो, त्या प्रमाणे ट्रॅक्टर चलित औजारे यामध्ये प्रमुख्याने पेरणी यंत्र , रोटाव्हेटर , नांगरणी यंत्र , असे शेती उपयोगी यंत्रा साठी शेतकरी अर्ज करू शकतात.
तसेच भाडे क्षेत्रावरील सेवा सुविधे द्वारे यंत्र बँक स्थापन करून शेतकरी गटासाठी यंत्र खरेदी करून गटातील शेतकरी भाडे तत्वावर यंत्रे भाड्याने घेऊन शेती करू शकतात. DBT YOJNA

DBT YOJNA सिंचन साधने सुविधा अंतर्गत शेतकरी ठिबक सिंचन , तुषार संच , शेततळे योजना , शेततळे पन्नी , शेतामध्ये पाईप लाईन कार्याची असेल तर पाईप लाईन तसेच मोटार पंप देखील अर्ज करता येतो.तसेच फळ बाग करीत भाऊसाहेब पुंडकर योजना द्वारे फळबाग साठी अर्ज करता येतो. तसेचखरीप रब्बी हंगाम मध्ये शेतकरी यांना पेरणी करण्याकरिता बियाणे देखील यावरून वाटप केले जाते.

यामध्ये जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्र पर्यंत लाभ दिला जातो तसेच यामध्ये पीक प्रात्यक्षिक करीता लागण्यारया बियाणाकरिता १००टक्के अनुदान दिले जाते प्रमाणित बियाणे करीत ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते तसेच बियाणे बरोबरच शेतकरी खतांसाठी देखील अर्ज करतात. त्याच प्रमाणे शेतकरी यांना शेडनेट, कांदा चाळ , पॅक हाऊस अशा विविध योजनांचा लाभ दिला जातो.

अशा प्रकारे शेती विकासाच्या विविध योजना चा लाभ आपणास महा डी बी टी पोर्टल द्वारे मिळतो परंतु या योजना मध्ये ज्याच्या द्वारे हि योजना राबिविले जाते. ते अशा अधिकारी वर्ग शेतकरी हे योजना लाभ घेत असतांनां फक्त अनुदान कसे भेटेल व वस्तू न घेता अनुदान लाटता येईल हा विचार करतात,

त्या मुले कोनतीही योजना पाहिजे त्या प्रमाणात परिणाम कारक रित्या राबवली जात नाही.ज्या वेळेस हि योजना सुरवातीला सुरु झाली त्या वेळेला योजना सुरळीत सूरु होती. मात्र देशात जेवढे कायदे आहेत तेवढ्या पळवाटा शोधून काढल्या जातात. त्या प्रमाणे यामध्ये देखील पळवाटा शोधून काढल्या गेल्या, त्या मुले योजनेचा मूळ हेतू बाजूला राहिला आहे कारण ज्या योजना राबविण्या साठी अनुदान दिले जाते त्या वस्तू खरेदी ना करता खोटी बिले दाखवून कागदो पत्री वस्तू , यंत्रे खरेदी केलेचे भासवले जात आहे.

आणि त्या बदल्यात अनुदान घेऊन भलत्याच ठिकाणी वापर केला जात आहे. परंतु मांजराने कितीही डोळे झाकून दूध पिले तरी चोरी उघडी पडते त्या नियमा प्रमाणाने या योजनेतील दोष बाहेर येऊ लागले आहे जसे कि ज्या वेळेस शेतकरी यांना खरी गरज आहे त्या वेळेस लाभ मिळत नाही.

त्या मुळे जे शेतकरी खरेच योजनेचं मनापासून वापर करण्यास उत्सुक आहेत त्याना स्व खर्चाने वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या मुळे शासनाने यामध्ये गैर प्रकार होऊ नये याकरिता अनुदान ऐवजी वस्तू स्वरूपात लाभ देता येईल या संबधीची चाचपणी सुरु केली आहे म्हणजे फक्त अनुदाना लाटण्या करिता जे शेतकरी गैर प्रकार करतात तो ना करता वस्तू दिल्या मुले योजना मूळ हेतू साध्य होण्यास काही प्रमाणात मदत होईल असे म्हणावे लागेल

Leave a Comment