ladki bahin yojna form rejected : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांसाठी एक महत्वाची माहिती आहे. ज्या महिलांनी लडकी बहिणी योजनेची फॉर्म ही आधारच्या ओटीपी द्वारे भरलेली आहे त्या महिलांना अशा महिलांना फॉर्म अंशतः रद्द(Provisionally Rejected) झाल्या संदर्भातील मेसेज येत असून अशा महिलांना फॉर्म पुन्हा भरावे लागणार आहे. तर काय आहे यामागचे कारण  या संदर्भातील माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

या कारणांमुळे होत आहे फॉर्म अंशतः रद्द( ladki bahin yojna form rejected Provisionally Rejected)

 मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म हे अद्यापही भरणे सुरू आहे. या योजनेचे दोन हप्ते काही महिलांना मिळालेले आहेत, मात्र काही महिलांचे फॉर्म हे अद्यापही पेंडिंग मध्ये दाखवत आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे की,  ज्या महिलांनी आधार ओटीपी बेस च्या आधारावर जे फॉर्म भरले आहेत अशा महिलांना आधार अपलोड करण्याची तसेच बँक पासबुक अपलोड करण्याचा टॅब हा उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता.
                          त्यामुळे त्या महिलांना आपले आधार कार्ड व बँक पासबुक अपलोड करत आले नव्हते त्यामुळे अशा महिलांना परत एकदा आपला फॉर्म भरावा लागणार आहे. त्याकरिता अशा महिलांनी ज्या महिलांनी आधार ओटीपी बेस च्या आधारावर फॉर्म भरले आहेत त्या महिलांनी आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे.
     त्यांना विचारणा करून आपला फॉर्म Resubmit सबमिट साठी आला आहे का या संदर्भात ती माहिती घ्यावी जर फॉर्म आपला Resubmit या ऑप्शन मध्ये आला असेल तर त्या फॉर्ममध्ये आपणाला आधार कार्ड तसेच बँक पासबुक अपलोड करायचे आहे हे सबमिट केल्याशिवाय आपला फॉर्म हा मंजूर होणार नाही.

या पद्धतीने करा अंशतः फॉर्म रद्द झालेल्या फॉर्मची दुरुस्ती ( ladki bahin yojna form rejected )

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत माझी बहीण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारीशक्ती दूत या ॲपवर भरता येत होते.  मात्र, जेव्हा या योजने करता नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आली त्यावेळेस  नारीशक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून  फॉर्म स्वीकारणे बंद करण्यात आले. त्यानंतर वेब पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरत असताना आधार ओटीपी च्या माध्यमातून फॉर्म भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती.
आधार ओटीपी बेस्ट फॉर्म भरताना आधारची माहिती तसेच आधार अपलोड करण्यासाठी व पासबुक अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. अशा महिलांनी आधार कार्ड तसेच पासबुक ची माहिती अपलोड केली नव्हती.
       आता मात्र पहिल्या टप्प्यातील महिलांना दोन हप्त्याचे वितरण करण्यात आलेली आहे आता दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांची वितरण करण्याची प्रोसेस करण्यासाठी फॉर्म तपासणी करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे अशा महिलांचे आधार कार्ड आणि पासबुक ची माहिती उपलब्ध नसल्याकारणाने आधार ओटीपी च्या माध्यमातून फॉर्म भरल्या गेलेल्या महिलांची फॉर्म ही तात्पुरती रद्द करण्यात येत असून,
      त्यासंदर्भातील मेसेज नोंदणीकृत मोबाईलवर पाठवले जात आहे. अशा महिलांनी घाबरून न जाता ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे अशा ठिकाणी संपर्क करून आपल्या फॉर्ममध्ये आधार कार्ड आणि पासबुक ची माहिती अपडेट करावी. ही माहिती अपडेट केल्यानंतरच अशा महिलांची फॉर्म ही मंजूर होणार आहेत.
अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरलेल्या महिलांनी. फॉर्ममध्ये Resubmit ऑप्शन आला आहे का, या संदर्भातील माहिती घेऊन लवकरात लवकर फॉर्म करावा तरच या योजनेअंतर्गत हफ्ते  मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे .ladki bahin yojna form rejected