kusum solar online application : शेतकरी हिताच्या अनेक योजना शासन तर्फे चालवल्या जातात. आज आपण अशाच शेतकरी बांधव साठी वरदान ठरलेल्या योजने विषयी माहीत घेणार आहोत. आपला भारत देश कृषी प्रधान देश असून भारतमध्ये बहुतांश लोक शेती वर उपजीविका अवलंबून आहे. भारत मध्ये बहुतांश शेती कोरडवाहू प्रकारची असून काही भागामध्ये बागायती शेती केली जाती बागायती शेती मध्ये पिकांना पाणी देण्यासाठी सुरवातीला बैल द्वारे चालविल्या जाणाऱ्या मोटेचा वापर केला जात असे, जसजसे नवीन तंत्र ज्ञान विकसित झाले तसे शेतीमध्ये देखील सुधारणा झाल्या.
त्यानंतर डिझेल वर चालणारे पंप द्वारे शेतीचे सिंचन केले जात असे . ज्या ठिकाणी लाईट उपलब्ध आहे त्या ठिकाणी लाईट द्वारे सिंचन केले जाते, या सिंचन पद्धती मध्ये शेतकरी यांना अडचणी येत असे तसेच डिझेल वर चालणाऱ्या पंप मुळे प्रदूषण देखील वाढत होते. हे दोष दूर करण्यासाठी सोलर पंप योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत विविध सौर कृषी पंप योजना राबविण्यात आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना त्या प्रमाणेच अटल सौर कृषी योजना राबविण्यात अली आहे पीएम कुसुम योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवणार आहे. त्यामुळे पिकांना शेतकऱ्यांना पाणी देणे दिवसा शक्य होणार आहे .PM-KUSUM
kusum solar online application पी. एम. कुसुम योजना.
म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान योजना सुरु झाली या योजने मध्ये ज्या शेतकऱ्या कडे सिंचना करिता लाईट ची व्यवस्था नाही अशा शेतकरी यांना या योजने अंतर्गत सौर ऊर्जा पंप दिला जातो यामध्ये शेतकरी यांच्या सिंचन स्रोत यापासून ६०० मीटर अंतर पर्यंत विजेचा खांब नसावा हि आठ आहे तसेच सिंचन साठी विहीर, बोरवेल, शेततळे , नदी अशा सिंचन स्रोत साठी शेतकरी अर्ज करू शकतो. ज्या शेतकऱ्या किमान एक एकर जमीन आहे असे शेतकरी या साठी अर्ज करू शकतात.PM-KUSUM
kusum solar online application या सौर पंप योजने मध्ये या पंप साठी करता येणार अर्ज.
योजने मध्ये तीन प्रकारचे पंप आहे ज्या मध्ये ३ एच.पी. ,५ एच.पी., ७ एच.पी. असे तीन प्रकारचे पंप शेतकरी यांना दिले जातात.३ एच.पी. पंप साठी शेतकरी कडे १ एकर ते २. ५ एकर दरम्यान जमीन असावी तसेच ५ एच.पी पंप करीत २. ५ पेक्षा जास्त व ५ एकर जमीन असावी, त्या प्रमाणे ७ एच.पी. पंप साठी पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी पात्र आहेत.
या मध्ये सर्व प्रकारच्या पंप साठी ठराविक कोठा राखीव ठेवलेला असतो. तसेच काही दुर्गम भागात ज्या ठिकाणी शेतकर्याचा प्रतिसाद कमी मिळाल्यास त्या विभागाचे पंप ज्या ठिकाणी मागणी जास्त आहे त्या ठिकाणी मागणी इथे त्या ठिकाणी पुरवले जातात. अशा प्रकारे जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्या मधून पात्र अर्जाची छाननी करून पात्र शेतकरी यांना पंप पुरवले जातात.
kusum solar online application सौर कृषी पंप योजनाचे मुख्य उद्दिष्ट –
कोणतीही योजना सुरु करतांना निश्चित हेतू मनात ठेवून योजना सुरु केली जाते त्या प्रमाने या योजनेचा देखील मुख्य हेतू आहे कि शेतकऱ्याचा विजेवर होणारे अवलंबित्व कमी करून शेती ओलिता खाली आणणे तसेच डिझेल पंप वापर कमी करून त्या द्वारे प्रदूषण कमी करणे. सौर पंप योजना सुरु होण्याच्या अगोदर शेतकरी यांना पिकांना पाणी देणेसाठी रात्री अपरात्री जागे राहून पिकांना पाणी द्यावे लागत होते.
अशातच सर्प दंश किंवा विंचू दंश यामुळे अनेक शेतकरी यांना आपला जीव गमावण्याची वेळ अली होती परंतु शेतकरी बांधवाना पीक वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत होती त्यामुळेच सौर पंप योजना सुरु करण्यात अली ज्याद्वारे शेतकरी याना दिवस सिंचन करता यावे व त्याचे उत्पन्न वाढ व्हावी हा उद्देश्य आहे. सौर पंप योजने अंतर्गत शेतकरी बांधव यांना १० टक्के हिस्सा भरावा लागतो बाकीचे ९० टक्के हिस्सा हे शासन अनुदान स्वरूपात भरते हे. जेणेकरून विजेच्या टंचाईवर मात करता येईल. शासनास विजेवर होणारे अवलंबित्व कमी करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवीवण्यावर भर देत आहे प्रत्येक गावात वीज पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.kusum solar online application
पीएम कुसुम योजना 2024 चे फायदे –
1. शेतकरी यांना रात्री पिकांना पाणी देणेची गरज नाही
2. सोलर मुले पिकांना वेळेवर पाणी देता येणार
3. ज्याचे कडे विजेचे जोडणी नाही त्याना मिळणार
4. पिकांचे उत्त्पन्न वाढण्यास मदत होणार
5. डिझेल पंप चा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषणात घट होणार
पीएम कुसुम योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता –
1. किमान एक एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे
2. सातबारा उतारा वर सिंचन स्रोत ची नोंद असणे आवश्यक आहे.
3. पत्त्याचा पुरावा आधार कार्ड असणे आवश्यक आहे
4. अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे
5. आधार कार्ड
6. मोबाईल नंबर
7. पासपोर्ट आकाराचे फोटो.
8.सातबारा वर सिंचन स्रोत सामायिक मध्ये उपलब्ध असेल तर शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर हमी पात्र द्यावे लागेल