havaman andaj : नमस्कार शेतकरी मित्रानो गेल्या कित्येक दिवसापासून राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन देखील होत नाहीये. राज्यामध्ये पावसाचं जोर वाढलेला असून काही भागात हलक्या पाऊस पडत आहे. तर आता हवामान कसे राहणार ते आपण पाहूया.
havaman andaj पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुणे मुंबई नाशिक या भागांमध्ये जोरदार असा पाऊस चालू आहे. चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. राज्यामध्ये पाच ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्याच्या दरम्यान नाशिक मुंबई पुणे या भागांमधे पाऊस होणार आहे तसेच राज्याची काही भागांमध्ये म्हणावा असा पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये देखील आता जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे त्या नागरिकांची आनंदाची बातमी म्हणावी लागेल. ही पुढील चार दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे.ऑगस्ट महिन्या मध्ये पाऊस जास्त खंडित राहणार नाही. म्हणजे पाऊस भाग बदलत पडत राहणार आहे. तर मराठवाड्या मध्ये ८ ते ९ तारखेला सूर्य दर्शन होणार आहे.
havaman andaj जोरदार पाऊस नाही मात्र श्रवण सरी कोसळणार
आठवड्यात कोणतेही प्रकारचा कमी दाबाचा पट्टा नसल्या कारणाने दमदार चा सार्वत्रिक दिवसभर चालणारा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र सकाळी सूर्यदर्शन होऊन दुपारी दुपारनंतर ढगाळ परिस्थिती राहून काही ठिकाणी पावसाच्या हालक्या सरी पडण्याची शक्यता मात्र आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहिल. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये श्रावण सरी पडत राहतील.
अशा प्रकारे राज्यामध्ये पाऊस मोठा खंड देणार नसून काही भागामध्ये विश्रांती घेणार असून. जेथे पाऊस विश्रांती घेईल तेथे शेतकऱ्यांनी आपली कामे उरकून घ्यावी.havaman andaj