falpik vima ambiya bahar 2024: राज्यातील बहतांश भागा मध्ये फळ पिकांची उत्पादन घेतले जाते. शेती हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा आहे त्यामुळे शेतीमध्ये होणारे उत्पादन बाजारामध्ये विक्री होईपर्यंत पैसे हातात येईल याची शाश्वती नसते. फळ पिकाच्या माध्यमातून होणारे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लावणे गरजेचे असते त्यामुळे शासन पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फळपिकांना संरक्षण देण्याचे काम करते. शेतकरी बांधव साठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेचे फॉर्म सुरु झाले आहे. शासनाने या योजनेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. या योजनेत होणारे बदल खालील प्रमाणे असणारा आहे.यावर्षी फळपिकांमध्ये काय बदल झाले आहेत ती झालेले बदल आज आपण पाहणार आहोत.
falpik vima ambiya bahar 2024 शासन निर्णय
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत फळ पिक योजना 2024- 25 मध्ये आंबिया बहारा करिता संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू ,सीताफळ, द्राक्ष या आठपिका करिता फळपीक योजना राबविण्यास मंजूर देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील फळपिकांना हवामान केंद्रातील नोंदीनुसार होणारे नुकसान यांची सांगड घालून होणारे नुकसान याची भरपाई कंपन्यांची राहिली यासंदर्भात शासनात कोणतेही जबाबदारी नाही.
falpik vima ambiya bahar 2024 योजनेची वैशिष्ट्ये
1.सदरची योजना महसूल मंडळात अधी सुचित केलेल्या पिकासाठीच असेल.
2. या योजनेत सहभागी होण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची बंधन नाही.
3. सदरची योजनाही शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनी सोबतच भाडेकरारणे आणि शेती करण्या शेतकऱ्यांना देखील या योजनेमध्ये सहभाग घेता येईल. परंतु त्यासाठी अधिकृत असा भाडेकरार नामा शेतकऱ्यांना फॉर्म सोबत अपलोड करावे लागेल.
4. या फळ पिक विमा योजनेअंतर्गत 30 टक्के विमा हप्ताची जबाबदारी केंद्र सरकार उचलणार आहे. त्या 30 टक्के किंवा हप्त्याच्या पुढील रकमेची जबाबदारी जबाबदारी शेतकरी आणि राज्य सरकार यांना उचलावी लागणार आहे.
5. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी कमीत कमी क्षेत्र हे 10 गुंठे कोकण विभागाकरिता व उर्वरित विभागाकरिता 20 गुंठे ते जास्तीत जास्त 4 हेक्टर पर्यंत मध्ये पर्यंत शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. जास्तीत जास्त चार हेक्टर ही मर्यादा सर्व फळ पिके व दोन्ही हंगामा मिळून लागू राहिल.
6. एका फळपिका करिता एका वर्षामध्ये कोणत्याही एकाच बहारामध्ये म्हणजे मृग किंवा आंबे बहार यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.
7. विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
8. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याकरिता देण्यात येणारे बँक खात्याला आधार लिंक असावे.
9. पीक विमा योजना अंतर्गत मिळणारे संरक्षण हे उत्पादन क्षम असणाऱ्या बागेला लागू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादनक्षम बागाचे वय लक्षात घेऊनच पिक विमा योजनेचा फॉर्म भरावा.
उत्पादनक्षम बागेची वय falpik vima ambiya bahar 2024
1.आंबा पाच वर्ष.
2.मोसंबी तीन वर्ष.
3.डाळिंब दोन वर्ष.
4.द्राक्ष दोन वर्ष.
कशा मध्ये झाले आहेत बदल
१. विमा हफ्ता मध्ये झाली वाढ.
२. पीकविमा च्या संरक्षित रक्कमेत झाली वाढ.
३. महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकामध्ये बदल.
४. पीक विमा भरणे हे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना
ऐच्छिक आहे
या वर्षीच्या फळपीक योजनेत अनेक महसूल मंडळ मध्ये फळ पिकाचे अधिसूचित पिकामध्ये बदल झाला असून ज्या महसूल मंडळा मध्ये जी पिके आधी सूचित झाले नाही त्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना विमा भरता येणार नाही . फळ पिके आधी सूचित करतांना ज्या महसूल मंडळामध्ये फळ पिकांची लागवड हि ५० एकर पेक्षा कमी आहे अशा महसूल मंडळामध्ये पिके काढून टाकण्यात अली आहे त्यामुळे ज्या महसूल मंडळामध्ये लागवड ५० एकर पेक्षा कमी आहे अशा मंडळात पीक विमा भरण्या पासून शेतकरी वंचित राहणार आहेत. पहा किती झाले आहे हफ्त्यामध्ये वाढ.falpik vima ambiya bahar 2024