DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख व्यवसाय शेती असून अशी शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून असणारी आहे. राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस असमान पडतो तसेच पावसामध्ये येणाऱ्या येणारा खंड यामुळे शेतीमुळे करण्यामध्ये शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. दीर्घकाल पावसामध्ये खंड पडल्यास पाण्याअभावी ताण येऊन पिके नष्ट होतात किंवा जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा अतिरिक्त पाणी नदीद्वारे वाहून जाते त्यासाठी पाण्याची साठवणूक करण्यासाठी शेततळे ही संकल्पना उदयास आली.
राज्यामध्ये पावसावर आधारित शेतीसाठी जलसंधारणाच्या उपयोजनांच्या द्वारी पाण्याची उपलब्ध वाढविण्यासाठी या पूर्वी शासनाने शेततळे योजनाही अनुदान तत्त्वावर राबवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे तसेच त्यांचे जीवन मान सुधारण्यास देखील मदत झालेली आहे.त्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकाम करता येत नाही अशा शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतीच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ नये यासाठी शासनाने वैयक्तिक शेततळे ही योजना सुरू केली असून या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी साठवून ठेवून पाण्याचा उपयोग करून त्यांची उत्पादन वाढ करण्यास मदत होणार आहे.DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE
राज्यातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने अवर्षण म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील तसेच आत्महत्याग्रस्त तसेच नक्षलग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णय अनुसार मान्यता देण्यात आलेली आहे.ही सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच या संदर्भातील शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.
DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत खालील घटकासाठी अनुदान वितरण करण्यात येते.
- वैयक्तिक शेततळे
- शेततळे अस्तरीकरण
- हरितगृह उभारणे
- शेडनेट हाऊस उभारणी
- सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान
योजनेअंतर्गत दिले जाणारा लाभाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 55% तरी इतर शेतकऱ्यांना पाच हेक्टर च्या मते 45% पर्यंत येते सदर अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना पाच हेक्टर च्या मर्यादित 45 टक्के अनुदान देण्यात येते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान अशी एकूण 80 टक्के व 75 टक्के अनुदान दिले जाते. वैयक्तिक शेततळे बाबीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत चालू वर्षाकरिता 40 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
सूक्ष्म सिंचन यामध्ये (केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी पूरक अनुदान)
- तुषार सिंचन
- ठिबक सिंचन
- वैयक्तिक शेततळे
DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE लाभार्थ्याची पात्रता
- अर्जदाराकडे किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची जमीन शेततळे करण्यासाठी अनुकूल असावी जेणेकरून पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाच्या द्वारे शेततळ्यात साठवून पुनर्भरण करणे शक्य होईल.
- अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजना सामूहिक शेततळे योजना अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेमधून शेततळे या घटकासाठी लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्याची निवड DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE
महा डी . बी . टी . पोर्टल वर शेतकरी विविध घटकासाठी अर्ज करू शकतो. त्या अर्ज केलेल्या घटकांमधून शेतकऱ्यांची संगणकीय पद्धतीने लक्की ड्रा काढला जाईल या पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाईल.
शेतकऱ्यांची वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात लाभ देण्यात येईल.
DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE शेततळ्यासाठी जागा निवड कशी करावी
- त्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे शक्यतो अशा जमिनीची शेततळ्यासाठी निवड करावी.
- काळी जमीन ज्यामध्ये चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे असे जमीन देखील शेततळ्यासाठी उपयुक्त असते.
- मुरमाड वालुकामय जमिनीमध्ये शक्यतो शेततळे करू नये.
- जल परिपूर्ण असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने शेत तळे घ्यावे.
- ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे तीन टक्के च्या आत मध्ये आहे त्या ठिकाणी शेतकरी घेण्यात यावी.
- नदी नाले ओढे यांच्या प्रवाहामध्ये शेततळे घेण्यात येऊ नये.
- इनलेट आउटलेट शेततळे करत असताना शेततळ्याच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर अशा शेततळ्याची निवड करावी.
- इनलेट आउटलेट शेततळे करताना शेततळ्या भरण्याकरता आवश्यक पाण्याचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE अर्ज कसा करावा
- वैयक्तिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल.
- अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना शेततळ्या घटकाची निवड झाल्यानंतर एसेमेसद्वारे कळवले जाईल.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करून योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
- पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेततळे खोदकाम पूर्ण करून घ्यावे.
अशाप्रकारे शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याची उपलब्धता होणार असून त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना काही अंशी मदत होणार आहे DBT YOJNA MAGEL TYALA SHETTALE