Bhausaheb fundkar yojna :शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीच्या योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे जे शेतकरीMNREGA अंतर्गत होणाऱ्या योजनेकरिता पात्र ठरत नाही त्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करिता सहाय्य दिले जाते.
Bhausaheb fundkar yojna : योजनेची व्याप्ती व अंमलबजावणी.
योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते.
Bhausaheb fundkar yojna : लाभार्थी पात्रता
खालील अटीची पूर्तता करणारे शेतकरी या योजनेकरिता पात्र राहतील
1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड योजना पात्र ठरू शकत नाहीत असे शेतकरी या योजने करिता पात्र राहतील.
2. या योजनेच्या अंतर्गत फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना या लाभार्थी होता येणार नाही.
3. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे जर लाभार्थी संयुक्तिक खातेदार असेल तर सर्व खातेदारांची संमती पत्र आवश्यक राहील.
4. मराठी पीडी पोर्टलवर महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्ज मधून सर्व सर्व साधारण, महिला आणि दिव्यांग व्यक्ती अनुसूचित जाती जमाती यांची निवड केली जाईल.
लाभासाठी क्षेत्राची मर्यादा (Bhausaheb fundkar yojna )
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोकण विभाग सोडून सर्व विभागात करिता कमीत कमी 0.5 हेक्टर ते 6 हेक्टर च्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. तर कोकण विभागासाठी ही मर्यादा 0.1 ते 10 हेक्टर इतकी राहील.
1. कमाल क्षेत्राच्या मर्यादेमध्ये शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा अधिक फळबाग पिकांची लागवड करू शकतो.
2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा लाभ घेतला असेल तर, उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर गरबा लागवड योजनेमधून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
3. लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही योजनेतून फळबाग लागवडीचा लाभ घेतला असेल तर त्या लाभ घेतलेल्या क्षेत्र सोडून कमाल मर्यादेपर्यंतच्या क्षेत्रासाठीच या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेता येईल.
या या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी आपण कोणकोणती पिकांचे लागवड करू शकतो किंवा त्या पिकांची अंतर काय याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढील लेखामध्ये बघणार आहोत.