ANNAPURNA YOJNA : ग्रामीण भागातील स्त्रियांचे धुरापासून संरक्षण व्हावी याकरिता उज्वला योजना अमलात आली होती. आणि त्याच योजनेच्या धर्तीवर माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तीन मोफत सिलेंडर देण्याची योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
केंद्र शासनाची योजना असलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेची राज्यामध्ये 52.16 लक्ष लाभार्थी आहेत. तसेच राज्यामध्ये सध्या सुरु असलेल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी बहीण या योजने अंतर्गत होणारे पात्र होणारे लाभार्थी कुटुंबाला वार्षिक तीन गॅस पूर्णपणे मोफत भरून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या या नावाने राबवण्यात येणार आहे.
केंद्र शासनाकडून प्रधान मंत्री उज्वला योजना ही सन 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबाला गॅस जोडणी देण्याची काम
तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराषट्रात साध्य स्थितीत प्रधान मंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस जोडणी असलेल्या लाभार्थ्यांना गॅसची पुनर्भरण करणे शक्य होत नाही. परिणामी लाभार्थी वृक्षतोड करून लाकडाचा वापर करतात. परिणामी वृक्ष तोड होण्या बरोबरच प्रदुषन देखील वाढते हे लक्षात घेऊन राज्यामध्ये अन्नपूर्णा योजना सुरु करण्यात येत आहे. ANNAPURNA YOJNA
ANNAPURNA YOJNA लाभार्थ्याची पात्रता
1.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसची जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
2. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असणारी पूर्वीचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
3. माझी बहीण लडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र होणारे लाभार्थी देखील या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
4. रेशन कार्ड नुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थ्यास या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळेल.
5. सदर योजनेचा लाभ केवळ 14.2kg वजनाचा गॅस सिलेंडरच्या जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच मिळेल.
ANNAPURNA YOJNA योजनेची कार्यपद्धती
1. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येते तसेच राज्य शासनाची योजना असलेली अन्नपूर्णा योजनेचे तीन गॅस सिलेंडरची वितरण देखील गॅस कंपन्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.
2. सध्या बाजारभावानुसार होणारी गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम 830 रुपये आहे. व प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना देण्यात येणारी सबसिडी 300 ही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 530 रुपये प्रति सिलेंडर लाभ मिळेल.
3. सदर योजनेअंतर्गत एका ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही.
4. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील त्या लाभार्थ्यांना तीन मोफत सिलेंडरचे वाटप देखील तेल कंपन्यांच्या मार्फत वाटप करण्यात येईल.
5. दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या राशन कार्डधारकांना या योजनेच्या लाभ भेटणार नाही
अशा प्रकारे उज्वला योजने अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी तसेच माझी बहीण लाडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थी याना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ANNAPURNA YOJNA