adhar mobile link status आधार ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे या पद्धतीने करा चेक

adhar mobile link status : माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म सध्या नारीशक्ती दूत या ॲपवर स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी आता फक्त वेबसाईटचा उपयोग करावा लागत आहे. परंतु वेबसाईटवर फॉर्म भरत असताना आधार चे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. मात्र अनेक महिलांची आधार ही मोबाईल ला लिंक नसल्याकारणाने महिलांना आधारची व्हेरिफिकेशन करण्यामध्ये अडचणी येत आहेत.

आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच भरता येणार फॉर्म.

नारीशक्ती दूत या ॲपवर फॉर्म भरत असताना महिलांचे आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक नव्हते. त्यावेळेस महिलांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी जाणवत नव्हत्या. मात्र नारीशक्ती दूत ॲप बंद झाल्यापासून फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट चा उपयोग करावा लागत आहे. मात्र वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी अगोदर आधारचे वेरिफिकेशन करून घ्यावे लागते मात्र हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असावा लागतो. अनेक महिलांचे आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे अशा महिलांना फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहेत. किंवा काही महिलांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहेत परंतु लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला आहे किंवा त्या नंबरचे सिम कार्ड बंद पडले आहे अशा प्रकारची स्थिती सध्या आहे. त्यामुळे अशा महिलांना देखील आधरचा ओटीपी मिळवण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिलांसमोर फॉर्म भरताना आपला मोबाईल आधारला लिंक आहे किंवा नाही हा एक मोठा प्रश्न आहे.  किंवा जर लिंक आहे तर कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे दोन प्रश्न सध्या महिला समोर जाणवत आहे.

आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही या पद्धतीने करा चेक

आपल्या आधार नंबर ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे अनेक महिलांना माहीत नाही हे पाहण्यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवर जावे लागेल. आपला आधार नंबर टाकून त्यानंतर कॅपच्या कोड टाकून सबमिट केल्यानंतर आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे यासंबंधीची माहिती तिथे दाखवली जाईल. तसेच मोबाईल नंबर च्या वैयक्तिक खाजगीपणा जपण्यासाठी फक्त मोबाईल नंबर चे शेवटचे तीन अंक आपल्याला तिथे दाखवले जातील त्यावरून तो नंबर आपला आहे किंवा नाही याची खात्री आपणाला करता येईल.

 

 

आधार ला कोणता नंबर लिंक आहे ते येथे क्लिक करून पहा

 

adhar mobile link status आधार ला मोबाईल नंबर लिंक कसा करावा

अनेक महिलांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे त्यांना फॉर्म भरणे मध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी आधार लिंक करणे गरजेचे आहे तर अनेक हा प्रश्न पडला आहे की आधार ला मोबाईल नंबर कुठे करावा, ज्या महिलांना अलार्म मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यांनी जवळच्या आधार सेंटरवर जाऊन आपला चालू मोबाईल नंबर देऊन आधार मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा त्यानंतर त्यांना फॉर्म भरता येईल.
अशाप्रकारे ज्या महिलांचे फॉर्म भरणे बाकी आहे त्या महिलांनी लवकरात लवकर आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा. खाते नंबर देखील आधार लां लिंक करून घावा. adhar mobile link status.

Leave a Comment