mahadbt portal शेती संबंधित योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर करा अर्ज .

शासनामार्फत लोक कल्याण करी विविध योजना राबविल्या जातात या योजनांची पैसे पूर्वी ऑफलाइन पद्धतीने दिले जात असत. मात्र यामध्ये या पद्धतीने पैसे पाठवताना लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ मिळत नसे यावर उपाय म्हणून पद्धतीने दिले जात असत. यावर उपाय म्हणून डी . बी . टी . पद्धत चालू केली जातात आपले सरकार डीबीटी पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असून या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेल्या हा एक दुवा आहे. राज्यातील विविध वना तसेच कृषीच्या विविध योजना राबवून त्याची कार्यप्रणाली व्यवस्थापन करणे आणि व्यवस्थापनासाठी एक पोर्टल तयार करणे ही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते यापूर्वी शेतीसंबंधीच्या विविध योजना वेगवेगळ्या विभागामार्फत राबविल्या जात होत्या त्या सर्व विभागांची एकत्र करून शासनाने त्यावर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.

महाडीबीटी पोर्टलची वैशिष्ट्ये

1. शेतकरी कृषीच्या संबंधित सर्व योजनांसाठी या साईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

2. आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे शेतकरी स्वतः वेळोवेळी तपासून पाहू शकतात.

3. या पोर्टल द्वारे शेतकरी कोणत्याही विभागाशी संबंधित असल्याची योजनांचा लाभ घेऊ शकतात.

4. या साइटवर अर्ज केल्यानंतर अर्ज केल्यापासून ते पेमेंट खात्यात पर्यंत सर्वप्रथम ऑनलाईन आहे त्यामुळे कुठल्याही कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही.

5. अर्जाची प्रक्रिया सुलभ तसेच डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा त्यामुळे कुठल्याही कार्यालयामध्ये कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही.

6. अर्ज मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक यामध्ये सुविधा.

 

mahadbt portal महा डीबीटी साईट वर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

1. आधार कार्ड

2. बँक पासबुक

3. सातबारा, आठ- अ

4. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक

 

या योजने करिता करता येतो ऑनलाईन अर्ज 

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण या घटकाच्या अंतर्गत नवीन ट्रॅक्टर , ट्रॅक्टर संचलित अवजारे ,पावर टिलर ,पावर विडर, बैलचलित अवजारे , मनुष्यचलीत अवजारे, स्वयंचलित अवजारे, यासारख्या विविध घटकांसाठी आपणास अर्ज करता येतो. त्याचप्रमाणे भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र याच्या अंतर्गत कृषी अवजारे बँकेची स्थापना करून गटातील शेतकरी या बँकेचा लाभ घेऊ शकतात. तसेच शेतीसाठी आवश्यक असलेला सिंचनाच्या घटकासाठी यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, नवीन शेत तळ्याचे खोदकाम करणे, पंप सेट, पाईप्स ,यासारख्या घटकाकरिता सिंचन सुविधांच्या अंतर्गत अर्ज करता येईल. तसेच प्रकल्प आधारित घटकांमध्ये शीतगृहाची स्थापना करणे, मशरूम युनिटची स्थापना करणे. ऑरगॅनिक शेती, रोपवाटिका, टिशू कल्चर युनिट, पॅक हाऊस उभारणी, यासारख्या घटकांचा लाभ घेता येतो. तसेच शेडनेट हाऊस, कांदा चाळ, बाग लागवड या योजनेमध्ये भाऊसाहेब फुंडकर या योजनेअंतर्गत नवीन फळ पिकाच्या लागवडी करता अर्ज करता येतो.

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

या योजनेच्या अंतर्गत नवीन विहिरीचे बांधकाम करणे जुनी विहिरीची दुरुस्ती करणे ही जोडणी आकार सौर ऊर्जा पंप सिंचन तुषार सिंचन शेततळ्याचे अस्तरीकरण करणे या घटकाकरिता अर्ज करता येतो.
 अशाप्रकारे संबंधित सर्व योजनांसाठी एकच साईट असल्याकारणाने शेतकऱ्यांना सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजनांच्या लाभासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

 

Leave a Comment