SOYBEEN TOP VERIETYनमस्कार शेतकरी बंधू लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. सुरुवातीला सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी कोणत्या कंपनीचे बियाणे वापरावे, कारण बियाण्यांची निवड चुकली तर शेतकऱ्यांची संपूर्ण हंगामाची मेहनत वाया जाऊ शकते. शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करत असताना जमिनीच्या अनुकूल असे बियाण्याची निवड करावी. कारण प्रत्येक जमिनीमध्ये उत्पादनाची क्षमता वेगवेगळी असते ते जमिनीला अनुसरून बियाण्याची निवड जर करण्यात आली तर शेतकऱ्यांना भरघोस असे उत्पादन होऊ शकते.SOYBEEN TOP VERIETY
SOYBEEN TOP VERIETY सोयाबीन सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरिपातील महत्त्वाचे पीक आहे शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी कोणती वाणची पेरणी करावी या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो. यंदा कुठल्या वानाची पेरणी करावी आपल्याकडे पाऊस किती पडतो आपल्याकडे हवामान कसे असते त्यानुसार शेतकऱ्यांना निर्णय घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. यासाठी आपण घेऊन आलो आहोत सोयाबीनच्या विविध प्रकारचे वाणांची माहिती आपण घेणार आहोत या अशा प्रकारच्या जाती आहेत की त्यातून आपल्याला उत्पादन जास्त मिळते व या जाती रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.
SOYBEEN TOP VERIETY सोयाबीन वानाचे प्रकार
1.अति लवकर येणारे वाण कालावधी 80 ते 85 दिवस.
2.लवकर येणारे वाण कालावधी 85 ते 95
3.मध्यम कालावधी येणारे वाण कालावधी 95 ते 105
4.उशिरा येणारे वाण कालावधी 105 ते 115 दिवस
SOYBEEN TOP VERIETY
KDS-726(फुले संगम)
वर्ष 2016
पिकाचा सर्वसाधारण कालावधी 100 ते 105 दिवस
सरासरी उत्पादन-10 ते 15 क्विंटल
वैशिष्ट्ये:-
तांबेरा जिवाणूजन्य ठिपके यासारख्या रोगासाठी हे वान प्रतिकारक्षम आहे.
दाण्यांचा आकार मोठा मिळतो.
ह्या वानामध्ये झाडांना अधिक फुटवे फुटतात.
KDS-753 (फुले किमया )
वर्ष 2017
पिकाचा सर्वसाधारण कालावधी 90 ते 100 दिवस
सरासरी उत्पादन-10 ते 12 क्विंटल
वैशिष्ट्ये:-
तांबेरा जिवाणूजन्य ठिपके यासारख्या रोगासाठी हे वान प्रतिकारक्षम आहे.
दाण्यांचा आकार मोठा मिळतो.
ह्या वानामध्ये झाडांना अधिक फुटवे फुटतात.
KDS-344(फुले अग्रणी)
वर्ष 2013
पिकाचा सर्वसाधारण कालावधी 100 ते 105 दिवस
सरासरी उत्पादन-8 ते 10 क्विंटल
वैशिष्ट्ये:-
तांबेरा यासारख्या रोगासाठी हे वान प्रतिकारक्षम आहे.
AMS-1001 (PKV,- येलो गोल्ड)
वर्ष 2018
पिकाचा सर्वसाधारण कालावधी 95 ते 100 दिवस
सरासरी उत्पादन-10 ते 15 क्विंटल
वैशिष्ट्ये:-
मुळकुज, खोडकुज,येल्लो मोझ्याक चक्रीभुंगा, खोडमाशी यासारख्या रोगासाठी हे वान प्रतिकारक्षम आहे.
SOYBEEN TOP VERIETY ग्रीन गोल्ड 3344
वैशिष्ट्ये:-
ह्या वाणामध्ये पानाचे प्रमाण कमी असल्यामुळे झाडावरून शेंगांची संख्या वाढते.
झाडाच्या खोडा पासून शेंड्यापर्यंत शेंगा लागतात.
60 ते 70% शेंगांमध्ये चार दाण्याचे प्रमाण आढळते.
या च्या कापणीस उशीर जरी झाला तरी शेंगा तडकण्याची प्रमाण कमी आहे. SOYBEEN TOP VERIETY
हे आहेत सोयाबीन चे उत्तम वाण परंतु शेतकरी यांनी आपली जमीन हवामान पाहूनच बियाणे याची निवड करावी कारण जमिनीतील घटकानुसार उत्पादनामध्ये फरक पडू शकतो त्यामुळे आपल्या जमिनीला पोषक असे बियाणे वापरून पेरणी करावी .