SCHOLARSHIP FORM शिष्यवृत्तीचा गुंता सुटता सुटेना
पैशा अभावी विदयार्थी शिक्षणात खंड पडू नये याकरिता शासन विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती राबवते परंतु संपूर्ण शैक्षाणिक वर्ष संपत आले तरीही विदयार्थी यांचा शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत भारत सरकारच्या मॅट्रिकोतर शिष्यवृती अर्जासाठी आता पर्यंत सहा वेळा मुदत वाढ दिली तरीही अर्जामधील गुंता सुटला नाही. हा गुंता ना सुटण्यामागे विध्यार्थी व महाविद्यालयाचा मिळणारा कमी प्रतिसाद करणी भूत आहे.
भारत सरकार मॅट्रीकोतर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय विध्यार्थी यांना महा डी बी टी या संकेत स्थळावर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे.
SCHOLARSHIP FORM शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे टप्पे
१. प्रथम विध्यार्थी ला आधार वेरिफिकेशन द्वारे नोंदणी प्रकिया पार पाडावी लागते.
ही नोंदणी दोन प्रकारे करता येते
पहिल्या प्रकारांमध्ये आधार नंबर शी लिंक असलेला मोबाईल वर मेसेज पाठवून आधार वेरिफिकेशन करता येते.
दुसरा प्रकार ज्यामध्ये बायोमॅट्रिक मशीन वर आपली बोटाद्वारे व्हेरीफिकेशन करता येते या दोन प्रकरणी आपणांस पोर्टल वर नोंदणी करता येते
२. नोंदणी झाल्या नंतर दुसरा टप्पा येतो तो साईट वर प्रोफाईल पूर्ण करण्याचा.
या दुसऱ्या टप्पे मध्ये खालील पायरीने अर्ज भरावा लागतो
1.पहिला टप्पा ज्यामध्ये आपणास अर्ज दाराचे वैयक्तिक माहिती जसे कि नाव मोबाईल नंबर , जात प्रमाण पात्र आहे /नाही जात प्रमाण पत्र ची माहिती तसेच रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते या विषयी माहिती द्यावी लागते.
2.दुसरा टप्पा यामध्ये आपणांस अर्जदाराच्या रहिवासी या विषयी माहिती द्यावी लागते
3.तिसरा टप्पा यामध्ये अर्ज दाराचे पालकांविषयी माहिती द्यावी लागते
4.चौथ्या टप्यात अर्जदार याच्या चालु वर्षातील शिक्षणा विषयी माहिती दयावी लागते म्हणजे अभ्यास क्रम कोणता कॉलेज चे नाव या विषयी माहिती लागते.
5.पाचव्या टप्प्यात मागील वर्षी घेतलेल्या शिक्षणा विषयी माहिती दयावी लागते.
6.सहावा टप्पा हा विध्यार्थी हॉस्टेल मध्ये राहत आहे किंवा कसे या संबधीचा आहे.
३. वरील प्रकारे सहा टप्पे पार पडल्या नंतर भरलेल्या माहितीच्या आधारे तो शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहे त्या योजना दाखविल्या जातात त्या पैकी पात्र योजनेसाठी विध्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरू शकतो.
४. शिष्यवृत्ती अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्याने अर्जीची प्रत प्रिंट करून महाविद्यालयात जमा करावी.
५. विध्यार्थीने शिष्यवृत्ती अर्ज सबमिट केल्यानंतर तो मंजुरी साठी संबधित कॉलेज च्या क्लार्क लॉगिन ला जातो. संबंधित लिपिक अर्ज चेक करून अर्जात त्रुटी आहेत कि नाही ते तपासून पाहतो जर अर्जामध्ये त्रुटी असतील तर संबंधित अर्जी विद्यार्थाला परत दुरुस्ती करीत परत पाठवला जातो. जर अर्ज व्यवस्थित असेल तर मंजुरी साठी तो प्राचार्य यांच्या लॉगीनला जातो.
६. प्राचार्य यांच्या लॉगीनला अर्ज गेल्यानंतर फॉर्म मध्ये काही त्रुटी असतील तर परत एकदा तो क्लार्क लॉगीनला परत पाठवला जातो. जर अर्ज व्यवस्थित असेल तर समाज कल्याण विभागाच्या क्लार्क लॉगिन ला फॉर्म जातो.
या पद्धतीने हि प्रकिया अशीच पुढे चालत राहते यातील एका जरी स्टेप मध्ये फॉर्म अडकून राहिला तर संबंधित अर्ज मंजुरी साठी जात नाही याच कारणामुळे
विध्यार्थाचे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रकार वाढत आहेत .
SCHOLARSHIP FORM शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागद पत्रे
१. आधार कार्ड
२. जात प्रमाण पत्र
३. उत्पन्न प्रमाणपत्र
४. तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र
५. अर्जदाराचे बँक खाते
६. चालू वर्षाची प्रवेश पावती किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र
७. व्यावसायिक अभ्यास क्रम असल्यास कॅप राऊंड चे प्रमाणपत्र.
८. मागील वर्ष्याच्या गुणपत्रिका
९. अभ्यासक्रमात अंतर असेल तर गॅप प्रमाण पत्र
१०. अर्ज दार वसतिगृहात राहत असेल तर त्या विषयीचे प्रमाणपत्र
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय विध्यार्थी चे शिक्षण केवळ आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून शिक्षण खंडित होऊ नये या करिता भारत सरकारच्या मॅट्रिकोतर शिष्यवृती योजना राबविली जाते शिष्यवृत्ती योजने मध्ये विविध टप्पे आहेत आणि त्या प्रत्येक टप्पा राबविणारे व्यक्ती वेगवेगळे आहेत.
सर्वांमध्ये समन्वय असेल तर हि प्रकिया जलद गतीने राबवणे श्यक आहे परंतु सर्व टप्प्यामध्ये समन्वय नसल्याकारणाने अर्ज मंजुरीस विलंब होतो. समाज कल्याण विभागाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा करिता ११ ऑक्टोबर पासून पोर्टल सुरु केले परंतु शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही १० हजार विध्यार्थाचे अर्ज प्रलंबित आहेत. जलद गतीने काम व्हावे या हेतूने पोर्टल सूर करण्यात आले तो हेतू काही पूर्ण झाला नाही त्या मुले या प्रकिया वरून सर्व घटक मध्ये समन्वय असेल तरच कोणतीही योजना पूर्णत्वास जाते. नाहीतर ज्या हेतूने योजना सुरु झाली तो हेतू काही पूर्ण होत नाही असेच म्हणावे लागेल