PIK VIMA STATUS :प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये पीक विमा भरल्यानांत आपणास पावती मिळते त्या पावतीच्या आधारे आपणास पीक विमा भरल्याची खात्री मिळते. मात्र मागील दोन तीन वर्षा पासून बऱ्याच ठिकाणी पीक विमा भारण्यामध्ये घोटाळे झाले आहे. यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या नावे विमा भरणे. दुसऱ्याची सातबारा जोडून विमा भरणे. सरकारी जमिंनी वर विमा भरणे अशी प्रकरणे समोर आलो आहे. त्या मुले आपण भरलेला विमा खरा आहे कि आपलो पावती बनावट आहे याबाबाद शेतकऱयांच्या मनामध्ये शंका असते मात्र शेतकरी वीमा पावतीच्या आधारे विम्याचे स्टेटस चेक करता येते ते कसे करायचे ते आपण बगणार आहोत.
१. सर्व प्रथम https://pmfby.gov.in/ या साईट वर जा .PIK VIMA STATUS

2.त्यानंतर Application Status या पर्यायावर जाऊन आपल्याला ज्या शेतकरी यांच्या पीक विमा पावतीचे स्टेटस चेक कार्याचे आहे त्याची नोंद करा.
3.त्यानंतर Application Status या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पीक विमा पावती वर डाव्या बाजूला असलेल्या क्रमकांची नोंद करून समोर दिसणाऱ्या कॅप्टचा कोडची नोंद करा. समोर दिसणाऱ्या Check Status या बटन वर क्लिक करा
4.समोर गेल्यानंतर पीकविमा कोणत्या वर्षी भरला आहे. खरीप आहे कि रब्बी विमा आहे. तसेच कोणत्या शेतकरी यांच्या नावे विमा भरला आहे. या संबधीची नोंद समोर दिसेल तसेच विमा फळबाग आहे कि भुसार मालाचा आहे. विमा सी एस सी मार्फत भरला आहे कोणत्या दिनांक ला फॉर्म भरला आहे या संबंधित नोंद आपणास समोर दिसते अशा प्रकारे शेतकरी आपल्या विमा पावती आधारे विमा भरल्याचे स्टेटस चेक करू शकतो.
5.या मध्ये फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक टिक हिरव्या रंगामध्ये दाखवली जाते तसेच पेमेंट झाले असेल तर दुसरी दोन टिक हिरव्या रंगामध्ये दिसतात आणि जेंव्हा फॉर्म कंपनी मार्फत पडताळणी करून मंजूर केला जातो तेव्हा तीनहि टिक हिरव्या दिसतात .

अशाप्रकारे शेतकरी यांना आपण भरलेल्या विम्या बाबतची माहिती मोबाइलला वर मिळते त्यामुळे आपण भरलेला विमा हा बनावट असेल तर त्यासंबधी शेतकरी कृषी कार्यालय मध्ये जाऊन तक्रार करू शकतात. PIK VIMA STATUS