MANSOON NEWS दिवसागणिक वाढत जाणारी उष्णता व उकाड्याचा त्रास यामुळे हैराण झालेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे . उकाड्यापासून सुटका मिळण्याची अशा निर्माण झाली आहे. कारण वेळेआधीच केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्याची बातमी येत आहे. हवामान विभागाच्या अंदांजनुसार ३१ मे रोजी दाखल होईल असे सांगितले होते मात्र एक दिवस अगोदरच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे. मान्सून चे लवकर आगमन झाल्यामुळे सर्वांची उकड्या पासून सुटका काही अंशी होणार आहे.
MANSOON NEWS केरळ मध्ये आगमन
वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरी देखील सुखावणार आहेत कारण वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरी यांना पेरणी पूर्व कामे करण्यास वेळ मिळणार असून शेतकरी अधिक जोमाने मशागतीच्या कामामध्ये वेग येणार आहे.MANSOON NEWS
मागील वर्षी मान्सून वेळेत दाखल न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्या मुळेच शेतकरी देखील या वर्षी तरी मान्सूनवेळेवर दाखल होतो कि नाही याची शेतकऱ्यांना चिंता लागून होती मात्र आता मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे आता लवकरच राज्यात देखील दाखल होईल त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत कामांना वेग आलेला असून बी बियाणे तसेच खते खरेदी मध्ये शेतकरी लगबग करतांना शेतकरी दिसून येत आहे .
मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे आणि लवकरच तो राज्यामध्ये देखील सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे . येत्या आठ ते दहा दिवसात मान्सून राज्यामध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे . ३१ मे पर्यंत मान्सून केरळ मध्ये दाखल होईल असे हवामान विभागाने संकेत दिले होते मात्र एक दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला आहे.