Mahamesh scheme भटक्या प्रवर्ग तील नागरिकांना उत्पन्न मिळवण्यासाठी जोड धंदा म्हणुन पशुपालन करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रकारचे योजना राबवते भटक्या जमाती क या प्रवर्गातील व्यक्तींसाठी 2017 -18 सालापासून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राज्यामध्ये राबवली जाते. ही योजना मुंबई व मुंबई उपनगरातील हे दोन जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. या योजनेमध्ये काही बदल करून या नवीन वर्षाकरिता 29.55 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
Mahamesh yojana या योजनेसाठी करता येणार अर्ज
१. कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
२. स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
३. ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थींना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे
४. ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थींना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे
५. ज्यांच्याकडे स्वत: च्या ६० मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थींना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे
६. ज्यांच्याकडे स्वत: च्या ८० मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थींना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे
७. ज्यांच्याकडे स्वत: च्या १०० मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्या आहेत अशा लाभार्थींना सुधारित प्रजातीचा ५ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे
८. ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
९. ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
१०. ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
११. ज्यांच्याकडे स्वत: च्या ४० मेंढया व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
१२. एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता)
१३. भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता).
१४. कुट्टी केलेल्या हिरव्या चार्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान वाटप
१५. पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान वाटपमेंढ्यासाठी चराई अनुदान..
१६. किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असणार्या मेंढपाळ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी रु. २४,०००/- चराई अनुदान वाटप करणेमेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान.
१७. भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किंवा ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी रु. ५०.०००/- च्या मर्यादेत ७५ % अनुदान देणे कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान.
१८. चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी ७५% अनुदान देणे.