mahadbt vihir yojna :राज्यातील अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध समाजातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवन मान उंचावण्यासाठी म्हणून शासनामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. पूर्वी ही योजना विशेष घटक योजना म्हणून राबविण्यात येत होती. मात्र सन दोन हजार सतरा या वर्षापासून ही योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेची निकष 2017 -18 या साली निश्चित करण्यात आलेले आहेत. मात्र महागाई मध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन या योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अनुदानामध्ये किती वाढ झाली आहे हे आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
mahadbt vihir yojna डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत या योजनांसाठी करता येणार अर्ज
1.नवीन सिंचन विहीर.
2.जुनी विहीर दुरुस्ती.
3.शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण.
4.इंनवेल बोरिंग.
5.विज जोडणी आकार.
6.विद्युत पंप संच डिझेल इंजिन.
7.सोलार पंप.
8.एचडीपीई पीव्हीसी पाईप.
9.सूक्ष्म सिंचन संच.
10.तुषार सिंचन संच.
11.ठिबक सिंचन संच.
12.तुषार सिंचन संच पूरक अनुदान.
13.ठिबक सिंचन संच पूरक अनुदान.
14.यंत्रसामग्री बैलचलित किंवा ट्रॅक्टर चलित.
15.परसबाग.
mahadbt vihir yojna डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
1.लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.
2.शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे.
3.शेतकऱ्याच्या नावे सातबारा उतारा आठ उतारा असणे बंधनकारक आहे.
4.आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
5.आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
6.दारिद्र्यरेषेखाली शेतकऱ्या स प्रथम प्राधान्य राहील.
7.एकदा या योजनेचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
8.सदर योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.
9.सदर योजनेअंतर्गत दीड लाख उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात आली आहे.
10.शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त सहा हेक्टर जमीन पर्यंत लाभ देय राहील.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अनुदानामध्ये झाली वाढ.
अशाप्रकारे ज्या शेतकऱ्यांना या योजने योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन आपल्या योजनेसाठी अर्ज करून घ्यावा. अशाप्रकारे अनुदानामध्ये वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार असून शेतकरी शेतीचा विकास होण्यामध्ये मदत होणार आहे.mahadbt vihir yojna