MAGNET PROJECT शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पादन वाढ करण्याची संधी

आपल्या देशातील बहुतांश शेतकरी शेती करतात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायला आवडते परंतु मुख्य अडचणी येते ती भांडवलाची. त्यामुळे शेतकऱ्यांना शासन देखील शेतीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळत नाही. शेतीमध्ये काबाडकष्ट करून उत्पादनात वाढ केली तरी बाजारामध्ये माल विकायला नेल्यानंतर त्याला योग्य असा भाव मिळत नाही.
या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प म्हणजेच मॅग्नेट प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या द्वारे राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत कशी मिळणार आहे तसेच कोणत्या पिकासाठी मिळणार आहे या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत.

काय आहे मॅग्नेट प्रकल्प

महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाद्वारे आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मॅग्नेट संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्रातील केळी, डाळींब, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिकु, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुले, आंबा, लिंबू, काजू, व पडवळ या निवडक १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकासावर हा प्रकल्प केंद्रित आहे.

प्रकल्पाचा उद्देश MAGNET PROJECT

हा प्रकल्प आशियाई विकास बँकेमार्फत 70 टक्के अनुदान तसेच सरकारमार्फत 30 टक्के अनुदान मार्फत राबवल्या जातो. या योजनेचा मुख्य उद्देश पिकांची काढणी बचत नुकसान कमी करून देशांतर्गत तसेच विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देऊन शेतमालांना अधिकार अधिक भाव मिळवून देणे हा आहे. मूल्य साखळी निर्माण करून खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा हेतू हा प्रकल्प सुरू करण्यामागे आहे हा प्रकल्प शेतकरी पद कंपन्या सोबतच कृषी विकास संस्थांसाठी देखील फायदेशीर आहे.

:योजनेसाठीची पात्रता MAGNET PROJECT

नोंदणी कृत शेतकरी उत्पादक कंपनी.
नोंदणी खूप शेतकरी उत्पादक कंपनी नसेल तर या प्रकल्पासाठी अर्ज करता वेळेस नोंदणी करण्यासाठी अर्ज केला आहे यासाठीच्या पुरावा जोडावा लागेल.
कंपनीचे एका वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे.
शेतकरी उत्पादक कंपनीने घेतलेले कर्ज एन ए मध्ये गेलेले नसावे.

 अकरा प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.MAGNET PROJECT

1. सोलर चलित शीतगृह क्षमता दहा टनापर्यंत 1.68 लाख/टन 
2. बायोमास चलित शीतगृह क्षमता 15 टन 8.96/टन
3. बाष्प शीतगृह क्षमता 100 किलो 25426/युनिट.
4. रिचार्जेबल रिफर कंटेनर ट्रक साठी. क्षमता  दहा फूट 3.85लाख/युनिट. क्षमता वीस फूट 6.32 लाख/युनिट
5. सोलार कंडक्शन ड्रायर
6. ऑप्टिकल ग्रेडर 
7. पोर्टेबल मृदा परीक्षण यंत्र 
8. फवारण्यासाठी चे ड्रोन 
9. एफ पी ओ व्यवस्थापनाकरिता चे सॉफ्टवेअर 
10. उपग्रह आधारित कृषी सल्ला 
11. आयओटी आधारित कृषी सल्ला 25 डिवाइस संच/ 50 डिव्हाईस संच.MAGNET PROJECT
 या  योजने करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 जुलै 2024 आहे.

Leave a Comment