ladki bahni yojna form update  :लडकी बहीण योजनेचे फॉर्म जुलै महिन्यापासून भरने सुरू आहे परंतु अद्यापही काही महिलांना  कागदपत्राच्या अभावी आपले फॉर्म भरता आलेले नाही अशा महिलांना आता फॉर्म भरण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे. शासन निर्णयानुसार सप्टेंबर महिन्यातील महिलांना फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. मात्र या योजनेमध्ये फॉर्म भरणार व्यक्तींची संख्या ही कमी  होत असल्यामुळे आता फक्त सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या अकरा प्रधीकृत व्यक्तींना  फॉर्म भरता येणार नाही.

 आता फक्त येथे भरता येणार फॉर्म ladki bahni yojna form update  

माझी बहीण लाडकी बहिण योजनेच्या फॉर्म भरण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. सुरुवातीला योजनेच्या सुरुवातीला फॉर्म भरण्याची संख्या भरपूर असल्यामुळे या योजनेअंतर्गत 11 प्रकारच्या प्राधिकृत व्यक्तींना फॉर्म स्वीकारण्यासाठी नेमण्यात आलेली होती. मात्र आता या योजनेअंतर्गत होणाऱ्या फॉर्म ची संख्या  कमी झालेली आहे. त्यामुळे आता फक्त अंगणवाडी सेविकडेच या योजनेअंतर्गत फॉर्म भरले जाणार आहेत.

 आता येथे भरता येणार नाही फॉर्म ladki bahni yojna form update 

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये देखील महिलांना फॉर्म भरता येणार आहे मात्र फॉर्म भरण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी व बालवाडी सेविका, समूह संघटक,  आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र,अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या प्रकारच्या व्यक्तींना फॉर्म भरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती मात्र आता फक्त अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरण्याची परवानगी असून बाकी ठिकाणी फॉर्म भरले जाणार नाहीत.

 

लाडकी बहीण योजनेच्या मध्ये काही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावे अनेक फॉर्म भरून  लाभ मिळाल्याच्या काही घटनासमोर आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फक्त अंगणवाडी सेविकांनाच आता या योजनेअंतर्गत भरले जाणारे फॉर्म भरता येणार आहेत त्यामुळे ज्या महिलांची फॉर्म भरायची बाकी आहे त्यांनी आता अंगणवाडीच्या इकडे जाऊनच फॉर्म भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.ladki bahni yojna form update