Crop insurance claim लवकर करा हे काम त्याशिवाय मिळणार नाही विम्याचा लाभ

Crop insurance claim : प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधव साठी महत्वाची माहिती आहे. सध्या जोरदार पाऊस चालू आहे. आणि या पाऊसने आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर शेतकरी यांनी जर विमा भरला असेल तर ते आपल्या पिकाच्या नुकसानी बाबतीत कंपनीला तीन दिवसाच्या आत कळवून आपल्या पिकांचा विम्याचा दावा करू शकतात विम्याचा दावा कसा करायाचा याची माहिती आपण येथे पाहणार आहोत.

विमा मिळणे साठी क्लेम करणे आव्यश्यक Crop insurance claim

सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच आणखी हि पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे पिकांचे नुकसानी पासून संरक्षण करण्याकरिता पीकविमा योजने केंद्र सरकार मार्फत सुरु करण्यात आली आहे. त्या नुसार शेतकरी नियमितपणे पीकविमा भरतात मात्र पूर्वी पीकविमा भरल्यानंतर पिकांचे नुकसान झाल्यानंतर कृषी विभागा मार्फत पिकाचे नुकसानी बाबतीत सर्व्ह केला जात असे व त्या सर्वे च्या आधारे कोणत्या मंडळात पीक नुकसान अधिक झाले आहे. त्या माहितीच्या आधारे शेतकरी यांना विमा भरल्याचे आधारे लाभ दिला जात असे. मात्र आता पीक विमा पद्धतीमध्ये बदल झाला असून आता शेतकरी यांना आपले वैयक्तिक नुकसान झाले तर आपण भरलेल्या पिकांच्या विम्याचा दावा करता येतो त्या साठी कृषी विभाग किंवा कंपनी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पीक नुकसानी बाबतीत माहिती द्यावी. आणि हे केले तरच आता आपल्या विम्याचा लाभ शेतकरी यांना मिळणार आहे. त्या मुळे शेतकरी यांना आपले पीक खराब झाले असल्यास तीन दिवसाच्या आत आपला दावा करावा.Crop insurance claim

 

पीक विमा क्लेम कसा करावा Crop insurance claim

शेतकरी आपला विमा क्लेम करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी
1. सर्व प्रथम आपल्या मोबाईल मध्ये गूगल प्ले स्टोर वरून हे ऍप इन्स्टॉल करून घ्यावे.

2. Continue Without Login वर क्लिक करून समोर जा.

3. त्यानंतर समोर दिसणाऱ्या पर्याय पैकी  Crop Loss  Report crop damage and claim यावर क्लिक करा

4. Crop Loss  Report crop damage and claim यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर    Crop Loss Intimation यावर क्लिक करा

5. Crop Loss Intimation यावर क्लिक करून समोर मोबाइलला वर ओटीपी पाठवून Mobile Verification करून घ्यावे.

6.त्यानंतर आपणाला समोर चार बाबीची नोंद करायची आहे

1.पहिली बाब म्हणजे. कोणत्या हंगामातील पिकांचा क्लेम करायचा आहे यामध्ये खरीप किंवा रब्बी यापैकी आपण ज्या पिकाचं क्लेम करणार करणार आहोत त्या पिकांचा हंगाम निवडायचा आहे.
2.दुसरी बाब म्हणजे कोणत्या वर्षीच्या पीक विम्याचा दावा करायचा आहे ते  वर्ष निवडायचे आहे.
3.तिसरी बाब म्हणजे फळबाग विमा चा दावा करायचा आहे की भुसार मालाचा त्याविषयीची नोंद येते तिसऱ्या घटकांमध्ये करायची आहे.
4.त्यानंतर शेवटी राज्याची नोंद करून समोर जायचे आहे.

7.त्यानंतर समोर गेल्यानंतर आपण विमा CSC माध्यमातून भरला असेल तर CSC चा पर्याय निवडून खाली दिलेल्या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या कॉलम मध्ये आपल्या पिक विमा पावती वरील नंबर भरून पुढे दिलेल्या आवश्यक ती माहिती भरून आपल्याला पिक विमा  क्लेम सबमिट करायचा आहे.

8. पिक विम्याच्या पावती नोंद करून समोर गेल्यानंतर आपण बदलेल्या विम्याच्या पिकांची माहिती समोर दिसेल त्यानुसार आपल्याला त्या पिकाचा अभिमान करायचा आहे त्यावर क्लिक करा आपल्या पिकांच्या नुकसानाची तारीख नुकसानी बाबतची टक्केवारी , पिकाच्या नुकसानीचा फोटो,यासंबंधी माहिती टाकून पीक विमा क्लेम  सबमिट करायचा आहे.

 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानी बाबतची ची माहिती आपण खरीप हंगाम 2024 मध्ये भरलेल्या पावतीला अनुसरून लवकरच आपला पिकाचा क्लेम करून घ्यावा. क्लेम केल्यानंतरच आपल्या पिकाच्या नुकसानी अनुसार आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे.

 

Leave a Comment