mahadt lottery update शेतकऱ्यांना विविध योजना एकाच पोर्टलमध्ये याकरिता महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहेत. या पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी योजनांसाठी अर्ज करता येतो या योजना अर्ज केल्या नंतर ठराविक कालावधीनंतर त्याची लॉटरी काढली जाते. ज्या शेतकऱ्यांची नावे लोकांमध्ये आले नाही त्या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रियांसाठी मेसेज द्वारे कळविले जाते. आता काही दिवसांमध्ये विधानसभांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एक लॉटरी काढली असून शेतकऱ्यांना आपली कोणती योजनेसाठी निवड झाली आहे ही पोर्टल जाऊन पहावी लागणार आहे.
mahadt lottery update महाडीबीटी पोर्टल वर केलेल्या अर्जासाठीची प्रक्रिया.
महाडीबीटी वर शेतकऱ्याकडून विविध योजनांसाठी अर्ज मागविले जातात. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर शेतकऱ्यांची विविध योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीनुसार निवड झाली आहे अशी शेतकऱ्यांना अर्जाच्या पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागते. यामध्ये शेतीची कागदपत्रे जशी सातबारा आठ अ उतारा पासबुक आधार कार्ड अधिक कागदपत्रे तसेच काही योजनांसाठी आवश्यक असणारी टेस्ट रिपोर्ट कोटेशन किंवा फळबाग योजनांसाठी लागणारी विविध प्रकारची अहवाल इत्यादी कागदपत्रे शेतकऱ्यांना आपल्या लॉगिन मधून अपलोड करावे लागतात. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या घटकासंबंधी पूर्व संमती दिली जाते. पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या घटकासंबंधीचे बिल हे पोर्टल अपलोड करने बंधनकारक असते. बिल अपलोड केल्यानंतर कृषी विभागामार्फत शेतकऱ्याच्या योजना संबंधीची जिओ टॅग करून खात्री केली जाते. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये योजनेच्या लाभाची रक्कम मिळते. क्रिया ही संपूर्ण प्रक्रिया करत नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
mahadt lottery update या तारखेला झाली महा डीबिटी पोर्टलची सोडत.
शेती संबंधी योजनांसाठी लॉटरी काढली असून ज्या तुझ्या शेतकऱ्यांची योजनांमध्ये निवड झाली आहे त्यांना अर्जाची पुढील प्रकिया करावी लागणार आहे. तरच त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान प्राप्त होणार आहे.
mahadt lottery update या पद्धतीने चेक करा आपली निवड झाली की नाही.
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आपली निवड झाली की नाही पाहण्यासाठी दोन पद्धतींनी करता येते. त्यातील पहिली पद्धत म्हणजे आपण फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्या नंबर वर आपली या योजनेमध्ये निवड झाली असून कागदपत्रे सात दिवसाच्या आत जमा करावे असे मेसेज आलेला असतो. योजनेसाठी निवड झाली आहे असे समजावे. किंवा आपण पोर्टलवर लॉगिन करून देखील कोणत्या योजनेसाठी आपली निवड झाली आहे चेक करू शकतो.
अशाप्रकारे महाडीबीटी पोर्टलवर फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना आपण केलेले योजना साठी आपण निवड झाली आहे की नाही चेक करून पहावे. संबंधी पुढील प्रक्रिया करून घ्या तरच या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे आधार लिंक बँक खात्यामध्ये मिळणार आहे.mahadt lottery update