ITI Admission Maharashtra प्रवेश प्रकिया सुरु

ITI Admission Maharashtra दहावी बारावीचे निकाल लागले आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात दहावीनंतर कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो त्या संदर्भातील माहिती घराघरातून घेतली जाते. आज आपण दहावीनंतरच्या आयटीआय प्रवेश विक्रीसाठी कोण कोण त्या बाबीची आवश्यकता बोलू शकत आहे आपण पाहणार आहोत.

ITI Admission Maharashtra आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. 

1. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जामध्ये दुरुस्ती करणे व प्रवेशाचे शुल्क जमा करणे दिनांक 3 जून 2024 पासून दिनांक 30 जून 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.

2. राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे दिनांक 5 जून 2024 ते 1 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. 

3. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी आहे विकल्प प्राधान्यक्रम सादर करणे दिनांक 5 जून 2024 पासून ते 2 जुलै 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत.

4. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 4 जुलै 2024 सकाळी 11 वाजता.

5. गुणवत्ता यादी बाबत काही हरकत असेल तर प्रवेश स्थळावर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक तसेच नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ई-मेल द्वारे हरकती नोंदवणे नोंदवणे दिनांक 4 जुलै 2024 ते दिनांक 5 जुलै 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत.

6. अंतिम गुणवत्ता यादी 7 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर केले जाईल.

7. पहिली प्रवेश फेरी दिनांक 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5वाजेला प्रकाशित केले जाईल.

8. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ओरिजनल प्रमाणपत्रासह व औद्योगिक संस्थांमध्ये हजर राहण्यासाठी दिनांक 15 जुलै 2024 ते 19 जुलै 2024. 

9. दुसरी प्रवेश फेरी साठी विकल्प सादर करणे दिनांक 15 जुलै 2024 ते 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.

10. दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये निवड झालेली निवड यादी दिनांक 27 जुलै 2024  रोजी जाहीर केली जाईल. 

11. दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये निवड झाल्या विद्यार्थ्यांनी दिनांक 28 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवेश प्रक्रिया करून घ्यावी.

12. तिसरे प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करण्यासाठी दिनांक 28 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत.

13. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठीची निवड यादी दिनांक 9 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता जाहीर केली जाईल.

 14. चौथी प्रवेश फेरी दिनांक 10 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत चौथ्या प्रवेश फेरीसाठी  साठी विद्यार्थ्यांना विकल्प सादर करता येईल. जर विद्यार्थ्यांनी विकल्पामध्ये बदल न केल्यास जुनेच विकल्प यासाठी ग्राह्य धरले  जातील.

15. विहित मदत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेले उमेदवारांना समुपदेशन  प्रक्रियेत सहभाग व्हायचे असेल तर त्यांना दिनांक 17 जुलै 2024 ते दिनांक 24 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून शुल्क भरता येईल.

16. वर दिलेल्या प्रवेश वेळापत्रक मध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यांचे नोंदणी उमेदवारांना एसएमएस द्वारे देखील प्रवेशाच्या वेळापत्रकाची अध्ययवत माहिती मिळवून देण्यात येईल त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.

ITI Admission Maharashtra प्रवेश अर्जासाठी लागणारे शुल्क:-

1. राखीव  प्रवर्ग 100 रुपये.

2. अराखीव प्रवर्ग 150 रुपये.

3. महाराष्ट्र राज्य बाहेरील उमेदवार 300 रुपये. 

4. अनिवासी भारतीय उमेदवार 500 रुपये. 

ITI Admission Maharashtra आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड

2. भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र.

3. एसएससी गुणपत्रिका. 

4. एच एस सी गुणपत्रिका बारावी पास  विद्यार्थ्यांसाठी.

5. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. 

6. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र.

7. मागास प्रवर्गात मोडणाऱ्या जातींसाठी जात प्रमाणपत्र तसेच वैध असे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.

8. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण अधिनियम 2024 च्या अनुषंगाने वैध असलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. 

9. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात अपंगत्वाचा प्रकार अपंगत्वाची टक्केवारी या संदर्भातील उल्लेख असलेले दिव्यांग प्रमाणपत्र.

10. विद्यार्थी वाढीव गुणाचा लाभ घेत असेल तर वाढीव गुणांच्या  लाभासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र.ITI Admission Maharashtra

प्रवेश फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment